शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 19:36 IST

Operation Sindoor: भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे.

पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा पुरती घायाळ झाली आहे. सुरुवातीला पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर भारताने आज पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा आणि रडार प्रणाली नष्ट केली. भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे.  अल कायदाच्या अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनन्टने ही धमकी दिली आहे. 

या संघटनेने सांगितले की, भारत दीर्घकाळापासून इस्लामविरोधात युद्ध करत आहे. हल्लीच झालेला हल्ला हा त्याचाच एक भाग आहे. अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनन्टने याबाबत पुढे सांगितले की भारतीय उपखंडामधील सर्व मुजाहिद्दीन आणि मुस्लिमांसाठी भारताविरोधात हे युद्ध जिहाद फी सबीलिल्लाह आहे. अल्लाची शिकवण पुढे नेण्यासाठी आणि इस्लाम व मुस्लिमांना वाचवण्यासाठी आणि उपखंडातील शोषितांचं रक्षण करण्यासाठी हे युद्ध जिहाद फी सबीलिल्लाह आहे. 

भारताने अनेक गुन्हे केले आहेत. भारताकडून हे कृत्य अनेक दशकांपासून सुरू आहे, असा दावाही या संघटनेने केला. दरम्यान, जिहाद फी सबीलिल्लाह याचा अर्थ अल्लाहच्या मार्गावरील संघर्ष असा होतो. अल कायदा आणि आयएसआयएससारख्या संघटना या शब्दाचा वापर आपल्या कारवायांचं समर्थन करण्यासाठी करत असतात. ते हिंसेला आणि दहशतवादाला समर्थन देण्यासाठी याचा वापर करतात.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndiaभारत