शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

"पैसे द्या नाहीतर किडनी विकू"; अझरबैजानमध्ये भारतीय तरुणांचे अपहरण, परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:34 IST

अमेरिकेत चोरट्या मार्गाने जाण्याच्या नादात गुजरातमधील दोघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली.

America Donkey Route: अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अवैध मार्गाने प्रवास करणाऱ्या गुजरातमधील दोन तरुणांना अझरबैजानमध्ये भीषण संकटाचा सामना करावा लागला. ध्रुव पटेल (२२) आणि दीपिका पटेल (३२) या दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना रक्ताळलेल्या अवस्थेत डांबून ठेवण्यात आले होते. अखेर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या हस्तक्षेपामुळे आणि भारतीय दूतावासाच्या ऑपरेशन महिसागरमुळे या दोघांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

प्रवास कसा सुरू झाला?

गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील कंथरिया येथील ध्रुव आणि दीपिका यांनी अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईतील एका एजंटशी संपर्क साधला होता. या एजंटने त्यांना डंकी रूट म्हणजेच अवैध मार्गाने अमेरिकेत नेण्याचे आश्वासन दिले. ध्रुवने या प्रवासासाठी ३५ लाख रुपये, तर दीपिकाने १५ लाख रुपये एजंटला दिले होते.३० जानेवारीला त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि १ फेब्रुवारीला ते अझरबैजानची राजधानी बाकू येथे पोहोचले. तिथे पोहोचताच एजंटने त्यांचे मोबाईल बंद करण्यास सांगितले.

अझरबैजानमध्ये काय घडले? 

बाकूमध्ये पोहोचल्यानंतर पवन नावाच्या एका एजंटने त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. तरुणांनी पैसे देण्यास नकार दिला असता, त्यांचे अपहरण करून त्यांना एका निर्जन घरातील तळघरात डांबून ठेवण्यात आले. अपहरणकर्त्यांनी ध्रुवला बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, त्याच्या कुटुंबीयांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर हा छळ दाखवण्यात आला. पैसे दिले नाहीत तर ध्रुवची किडनी काढून विकू, अशीही धमकी अपहरणकर्त्यांनी दिली.

घाबरलेल्या कुटुंबीयांनी कसेबसे ६५ लाख रुपये जमवले आणि त्यातील निम्मी रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे दिली. मात्र, पैसे घेऊनही अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडले नाही आणि अजून पैशांची मागणी केली.

कसे झाले ऑपरेशन महिसागर?

आणखी काही पर्याय उरला नसल्याने कुटुंबीयांनी आणंदचे खासदार मितेश पटेल यांची भेट घेतली. खासदारांनी तात्काळ दिल्लीत एस. जयशंकर यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर भारतीय दूतावासाने अझरबैजान सरकारवर राजनैतिक दबाव आणला. भारतीय अधिकाऱ्यांनी ऑपरेशन महिसागर सुरू केले आणि अवघ्या २४ तासांच्या आत त्या घराचा शोध घेतला. एका धाडसी मोहिमेत दोघांचीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली.

सध्या ध्रुव आणि दीपिका अझरबैजानमधील भारतीय दूतावासाच्या संरक्षणाखाली असून त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. खासदार मितेश पटेल यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून, तरुणांनी अशा शॉर्टकटच्या आणि बेकायदेशीर मार्गांच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian youth kidnapped in Azerbaijan, rescued after ministry intervention.

Web Summary : Two Gujaratis, dreaming of America, were kidnapped in Azerbaijan. They were rescued after the Indian embassy intervened following threats for ransom. The External Affairs Minister's intervention and 'Operation Mahisagar' ensured their safe return. Victims were lured via illegal routes to US.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातAmericaअमेरिका