शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:17 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. युद्धविराम पाळला नाही तर इराणवर मोठा हल्ला करण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

मध्य पूर्व आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्येयुद्धविरामाचा प्रयत्न सुरू असतानाच, आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर युद्धविरामाच्या अटी पाळल्या गेल्या नाहीत आणि होर्मुजची कोंडी फोडली नाही, तर इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल," अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणाऱ्या निर्णायक बैठकीच्या अवघ्या काही तास आधी ही धमकी आल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

"आमचे सैन्य आरामात आहे, पण सज्ज आहे!"

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकन सैन्याच्या तयारीचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, "युद्धविराम लागू झाला असला तरी आमचे सैनिक इराणच्या आजूबाजूलाच तैनात आहेत. त्यांनी आपला दारूगोळा पुन्हा भरून घेतला असून ते केवळ विजयाची प्रतीक्षा करत आहेत. जोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवर समझोता लागू होत नाही, तोपर्यंत आमचे सैन्य तिथून हलणार नाही. अमेरिका पुन्हा एकदा जागतिक पटलावर आक्रमकपणे परतली आहे."

पाकिस्तानमध्ये उद्या हायव्होल्टेज बैठक

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिना लॅविट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे ही महत्त्वाची बैठक होणार आहे. अमेरिकेतर्फे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत, तर इराणकडून संसदेचे अध्यक्ष गालिबफ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या चर्चेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर हे देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

इराणचा उलटवार: "अमेरिका आणि इस्रायलने विश्वासघात केला!"

दुसरीकडे, इराणने अमेरिकेवर युद्धविरामाच्या तीन महत्त्वाच्या अटी तोडल्याचा आरोप केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, "इस्रायलने बुधवारी बैरूतमध्ये केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे हा करार धोक्यात आला आहे. लेबनानवरील हल्ले थांबवणे ही कराराची अट होती." इराणने स्पष्ट केले आहे की, जर अशा प्रकारे हल्ले सुरू राहिले, तर ते युरेनियम नष्ट करणार नाहीत आणि होर्मुज सामुद्रधुनीवरील निर्बंधही कायम ठेवतील.

होर्मुज सामुद्रधुनीचे महत्त्व काय?

होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. इराणने हा मार्ग रोखून धरल्याने जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवण्याची भीती आहे. ट्रम्प यांनी हा मार्ग त्वरित खुला करण्याची मागणी केली असून, तसे न झाल्यास लष्करी कारवाई अटळ असल्याचे संकेत दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Open Hormuz Strait or Else: Trump's Final Warning to Iran

Web Summary : Trump warns Iran of a massive attack if Hormuz Strait remains closed and ceasefire terms are violated. Iran accuses US/Israel of breaking ceasefire terms, threatening to halt uranium destruction and keep the strait closed. High-stakes talks are set to occur in Islamabad.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्ध