अरेरे.. काय वेळ आली! जेम्स बाँड विकतोय ' पान मसाला'

By Admin | Updated: October 7, 2016 13:37 IST2016-10-07T12:20:29+5:302016-10-07T13:37:54+5:30

'जेम्स बाँड'ची भूमिका साकाणारा हॉलिवूड अभिनेता पिअर्स ब्रॉस्नन 'पान मसाल्या'च्या जाहिरातीत झळकल्याने सोशल मीडियावर विनोदांना पूर आला आहे.

Oops! What time it is! 'Pan masala' for James Bond sells | अरेरे.. काय वेळ आली! जेम्स बाँड विकतोय ' पान मसाला'

अरेरे.. काय वेळ आली! जेम्स बाँड विकतोय ' पान मसाला'

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - ' माय नेम इज बाँड.. जेम्स बाँड'.. इयान फ्लेमिंग लिखीत 'जेम्स बाँड'च्या पात्राला चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर न्याया देणारे अनेक हिरो झाले. शॉन कॉनेरी, रॉजर मूरी, पिअर्स ब्रॉस्ननपासून ते सध्याच्या डॅनिअल क्रेगपर्यंत सर्वांनी ही भूमिका आपल्या अनोख्या अंदाजाने रंगवली. मात्र आता याच '007 - जेम्स बाँड'वर चक्क पानमसाला विकण्याची वेळ आली आहे...!
वाचून दचकलात ना? पण हे खरं आहे. ' गोल्डन आय', ' डुमॉरो नेव्हर डाईज', ' दि वर्ल्ड इज नॉट इनफ' आणि ' डाय अनदर डे' यासारख्या अनेक चित्रपटात ' जेम्स बाँड'च्या भूमिकेत झळकलेला निळ्या डोळ्यांचा अभिनेता पिअर्स ब्रॉस्नन हा ' पान बहार' या पान मसाल्याच्या जाहिरातीत झळकला आणि सर्वजण थक्क झाले. सोशल मीडियावर प्रत्येक विषयावर चर्वितचर्वण करणारे नेटीझन्स ही संधी तरी कशी सोडतील. अवघ्या काही वेळात अनकेांनी या विषयावरून वेगवेगळ्या, मजेशील कॉमेंट्स टाकल्या आणि ट्विटरच्या ट्रेंडिगमध्ये ' पिअर्स ब्रॉस्नन' तिस-या स्थानावर झळकला.
(#संस्कारी जेम्स बाँड: ट्विटरकरांनी उडवली सेन्सॉर बोर्डाची खिल्ली)
  •  

Web Title: Oops! What time it is! 'Pan masala' for James Bond sells