शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:38 IST

पंतप्रधान पाशिनियान आणि प्रभावशाली आर्मेनियन अपोलोस्टिक चर्च यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या अटक करण्यात आल्या आहेत.

येरेवन - आर्मोनियात सत्ता उलथवून लावण्याचा प्रयत्न अयशस्वी करून १४ जणांना अटक केल्याचा दावा तिथल्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या अटक केलेल्या लोकांमध्ये ईसाई धर्मगुरू आर्कबिशप बगरात गॅल्स्टैनियन आणि एका खासदाराचा प्रमुख सहभाग आहे. सुरक्षा दलाने एका वरिष्ठ धर्मगुरूशी संबंधित सत्तांतराचा कट उधळून लावला आहे. आर्मेनियाच्या तपास समितीनुसार गॅल्स्टैनियन आणि इतर १५ जणांवर दहशतवादी हल्ल्याचे षडयंत्र आणि सत्ता काबीज करण्यासाठी आवश्यक असलेली साधने, उपकरणे जमा केल्याबद्दल गंभीर आरोप दाखल केले आहेत असं आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांनी सांगितले. आर्मेनिया आणि भारत यांच्यात खूप जवळचे धोरणात्मक संबंध आहेत आणि हा देश भारतीय शस्त्रास्त्रांचा एक प्रमुख खरेदीदार आहे.

देशात हल्ला करून दंगल घडवण्याचा कट

कथित षडयंत्रानुसार, आर्मोनिया देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करणे, मोठ्या प्रमाणात दंगल पेटवणे, सरकारी वेबसाईटवर सायबर हल्ला यासारख्या विविध योजना बनवून त्यासाठी २०० बंडखोरांचा गट तयार करण्यात आला होता. जानेवारी २०२५ पासून जवळपास १ हजार जण या कटात सहभागी झालेत. त्यामुळे या पुढच्या काळात या प्रकरणात आणखी मोठ्या संख्येने लोकांना अटक होऊ शकते असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.

पाशिनियान आणि चर्चेमध्ये संघर्ष

पंतप्रधान पाशिनियान आणि प्रभावशाली आर्मेनियन अपोलोस्टिक चर्च यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या अटक करण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. २०२० मध्ये काराबाख प्रदेशात अझरबैजानकडून आर्मेनियाचा लष्करी पराभव झाल्यानंतर पाशिनियान आणि चर्चमधील वाद निर्माण झाला, त्यानंतर चर्चने पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास सुरुवात केली. २०२३ मध्ये अझरबैजानने या प्रदेशावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर हा वाद वाढला. पाशिनियान अझरबैजानसोबत शांतता करारासाठी जोर धरण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आर्मेनिया काराबाखवरील आपले दावे सोडेल. अनेक आर्मेनियन लोक या प्रदेशाला त्यांच्या पूर्वजांची भूमी मानतात.

अपोलोस्टिक चर्चचा आर्मोनियात खूप प्रभाव आहे. चौथ्या शतकापासून ईसाई धर्माचा प्रभाव असणारे हे पहिले राष्ट्र बनले आहे. विरोधी चळवळ 'सेक्रेड स्ट्रगल'चे नेतृत्व करणाऱ्या गॅल्स्ट्रनियन यांनी गेल्या वर्षी काराबाख अझरबैजानला सोपवल्याचा आरोप पाशिनियानवर केला आणि मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. त्यांचे वकील रुबेन मेलिक्यान यांनी या अटकेचा निषेध केला  कारण ही अटक राजकीयदृष्ट्या प्रेरित होती असा आरोप करण्यात आला. आता तपास समितीने गॅल्स्ट्रेनियन सेक्रेड स्ट्रगल आंदोलनाशी संबंधित ९० हून अधिक ठिकाणी धाड टाकली. त्यात १४ जणांना अटक केली आहे. १६ संशयितांविरोधात तपास सुरू आहे. या छापेमारीत बंदूक, दारूगोळा साठा जप्त केल्याची माहिती समोर आणली आहे. 

टॅग्स :Indiaभारत