काबूल विमानतळाजवळ आत्मघातकी कार स्फोटात १ ठार
By Admin | Updated: December 28, 2015 15:08 IST2015-12-28T11:31:54+5:302015-12-28T15:08:45+5:30
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हमीद करजाई विमानतळाजवळ झालेल्या आत्मघातकी कारस्फोटात एक व्यक्ती ठार झाली.

काबूल विमानतळाजवळ आत्मघातकी कार स्फोटात १ ठार
>ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. २८ - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हमीद करजाई विमानतळाजवळ झालेल्या आत्मघातकी कारस्फोटात एक व्यक्ती ठार झाली आहे. भारतीय वेळेनुसार आज सकाळी ८ वाजता हा स्फोट झाला. या हल्ल्यात अन्य चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.या हल्ल्यानंतर विमानतळाजवळ गोळीबार झाल्याच वृत्त आहे, मात्र त्यास कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.