नवी दिल्ली - पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा भारताचा जगभरात फटका बसत असून, यामुळे जगभरात २४.२ कोटी मुलांना, तर भारतातील ५ कोटी ४७ लाख मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. ७ पैकी एका मुलाचे शिक्षण हवामान संकटामुळे थांबले असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. हवामान बदलांमुळे आलेल्या आपत्तींचा आशिया, आफ्रिका खंडातील गरीब देशांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला.
भारत झाला अत्यंत संवेदनशील देशभारत हा हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील देश आहे. २०२१ च्या युनिसेफ चिल्ड्रेन क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार, भारत १६३ देशांत २६ व्या स्थानावर आहे.पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ यांसारख्या जलद उद्भवणाऱ्या आपत्तींमुळे शाळांचे वारंवार नुकसान होत आहे, तर प्रचंड उष्णता आणि वायुप्रदूषण यांसारखे पर्यावरणीय ताण मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवत असून, मुलांच्या शालेय उपस्थिती तसेच शैक्षणिक प्रगतीत अडथळा आणत आहेत.
११.८ कोटी मुलांना आले शिक्षणात अडथळेदक्षिण युरोप, आशिया, आफ्रिकेत पूर, चक्रीवादळे होतात. मात्र, तिथे गेल्यावर्षी उष्णतेच्या लाटेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. एप्रिलमध्ये प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्तींमुळे ११.८ कोटी मुलांच्या शालेय शिक्षणात अडथळे आले. आशियात उष्णतेच्या लाटेमुळे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.
१२.३ कोटी विद्यार्थ्यांवर कोणत्या महिन्यात कोणते संकट आले? जानेवारी वादळफेब्रुवारी पूरमार्च पूरएप्रिल उष्णतेची लाटमे उष्णतेची लाटजून उष्णतेची लाटजुलै उष्णतेची लाटऑगस्ट चक्रीवादळसप्टेंबर चक्रीवादळऑक्टोबर चक्रीवादळनोव्हेंबर वादळडिसेंबर चक्रीवादळ
२४.२ कोटीफटका बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७४ टक्के विद्यार्थी हे कमी आणि निम्न-मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत.१७.१ कोटीविद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटा हा शालेय शिक्षणात व्यत्यय आणणारा सर्वांत मोठा हवामान धोका ठरला.११ कोटीमुलांना हवामान बदलाचा सर्वाधिक फटका एप्रिलमध्ये बसला. यात बांगलादेश, कंबोडिया, भारत, फिलिपिन्स आणि थायलंडमधील मुलांचा समावेश आहे.
८५ देश किंवा प्रदेशांमध्ये शाळा हवामानाशी संबंधित धोक्यांमुळे प्रभावित झाल्या, तर २३ देशांना अनेक वेळा शाळा बंद कराव्या लागल्या.१८ देशांना सप्टेंबर महिन्यात हवामानाशी संबंधित बदलांमुळे शाळा सुरू करण्यात मोठा फटका बसला. यागी वादळामुळे पूर्व आशियात फटका बसला.
हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या संकटांमुळे लोकांना गंभीर संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून शाळेत जाणारे विद्यार्थीही सुटलेले नाहीत. ते शाळेत जाऊ शकत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहतात. - कॅथरीन रसेल, कार्यकारी संचालक, युनिसेफ.