खदानीत सापडल्या एक अब्जच्या नोटा
By Admin | Updated: June 2, 2017 00:29 IST2017-06-02T00:29:54+5:302017-06-02T00:29:54+5:30
रस्त्यावर एखादी नोट सापडली तर ती पटकन खिशात टाकण्याची प्रवृत्ती तशी सगळीकडेच दिसून येते. मात्र, रशियातील सेंट पिटर्सबर्ग

खदानीत सापडल्या एक अब्जच्या नोटा
सेंट पिटर्सबर्ग : रस्त्यावर एखादी नोट सापडली तर ती पटकन खिशात टाकण्याची प्रवृत्ती तशी सगळीकडेच दिसून येते. मात्र, रशियातील सेंट पिटर्सबर्ग शहरात एका खदानीच्या परिसरात नोटांचा खच पडला होता; पण कोणीही त्या नोटांना हात लावू शकत नव्हते. कारण, या नोटा पूर्व सोव्हियत संघाच्या काळातील आहेत आणि त्या चलनातून बाद झाल्या आहेत. या नोटांचे मूल्य ११३ कोटी रुपये एवढे आहे. राजधानी मॉस्कोपासून १६० किमी अंतरावर असलेल्या या खदानीत सोव्हियत संघाच्या काळात मिसाइल ठेवले जात होते. येथे नोटा सापडल्याची माहिती लपून राहिली नाही. १९६१ नंतर या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. असे सांगितले जाते की, या भागात काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरात या नोटा वाहून येथे आल्या असाव्यात. स्थानिक लोकांनी सांगितले की, ज्या खदानीजवळ या नोटा सापडल्या त्या ठिकाणी राहण्याची कोणी हिंमत करत नाही. कारण, त्या ठिकाणी सोव्हियत संघाचे मिसाइल ठेवले जात होते. त्यामुळे हा परिसर रेडिएशनने प्रभावित आहे.