OMG : प्रेम सिद्ध करण्यासाठी हे जोडपे पिते एकमेकांचे रक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 17:00 IST2017-06-07T16:26:16+5:302017-06-07T17:00:13+5:30
तुम्ही हॉलीवूडचे राँग टर्न आणि "झॉम्बी" हे चित्रपट कदाचित पाहिले असतील. या चित्रपटामध्ये माणसांचे मांस खाणारे झॉम्बी तुम्हीला पहायला मिळतात. चित्रपटात असे...

OMG : प्रेम सिद्ध करण्यासाठी हे जोडपे पिते एकमेकांचे रक्त
ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 7 - तुम्ही हॉलीवूडचे राँग टर्न आणि "झॉम्बी" हे चित्रपट कदाचित पाहिले असतील. या चित्रपटामध्ये माणसांचे मांस खाणारे झॉम्बी तुम्हीला पहायला मिळतात. चित्रपटात असे होऊ शकते, वास्तवात नाही असे तुम्हाला वाटेल. मात्र इटालीमध्ये असे एक प्रेमी युगुल आहे. हे जोडपे एकमेकांचे रक्त पितात.
प्रेमासाठी काहीपण म्हणतात ना, कोणी एकमेंकांच्या नावाचा टॅटू काढत असतात. आजकालचे तरुण-तरुणी आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी काहीही कण्यास तयार असातात. इटालीतील 20 वर्षीय लेडीच वॅम्पायर इलारिया आणि तिचा 30 वर्षाय प्रियकर आरो ड्रवेन हे आपलं प्रमे सिद्ध करण्यासाठी एकमेंकाचं रक्त पितात. इतंरापेक्षा आमचे प्रेम कसे श्रेष्ठ आहे. हे जगाला दाखवण्यासाठी आणि एकमेकांचा विश्वाच संपादन करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग करतात. सध्या हे कपल सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांचे फोटोही सोशम मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, एकमेंकाचे रक्त पित असल्यामुळे आमचे नाते-संबंध टिकून असल्याचे हे प्रेमी युगल सांगतात.