लॉकडाऊनचा विपरीत परिणाम, १४०० रुपयांसाठी ऑलिम्पिक विजेता खेळाडू करतोय 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:14 PM2020-05-18T16:14:34+5:302020-05-18T16:14:54+5:30

घरात पैशांची चणचण असून आता एका वेळचं पोट कसं भरायचं हा प्रश्न  रिओलाही पडला होता. सध्याच्या घडीला घरची परिस्थिती फारच बिकट आहे.

Olympic medallist Ryo Miyake turns to delivery boy for money-SRJ | लॉकडाऊनचा विपरीत परिणाम, १४०० रुपयांसाठी ऑलिम्पिक विजेता खेळाडू करतोय 'हे' काम

लॉकडाऊनचा विपरीत परिणाम, १४०० रुपयांसाठी ऑलिम्पिक विजेता खेळाडू करतोय 'हे' काम

Next

संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले असून जगभरातील विविध देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एक वेळेेचं जेवणसुद्धा मिळेल की नाही याचीदेखील शाश्वती नाही. अशीच वेळ ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूवर आली आहे. कोरोनामुळे जपान ऑलिम्पिक 2020 पुढे ढकलण्यात आला आहे, अशा परिस्थितीत, प्रसिद्ध खेळाडू जपानी तलवारबाज रिओ मियाके डिलिव्हरी बॉय बनला आहे. 

लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्य पदक आणि 2014 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. लॉकडाऊनमुळे जगभरातील सर्वच स्पर्धांवर ब्रेक लागल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खेळाडूंना जो पोषक आहार मिळायला हवा, दोन वेळच्या जेवणासाठीदेखील पैसै नाहीत. जगाच्या विविध देशावर लॉकडाऊनचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून लॉकडाऊनची  झळ आता सर्वसामान्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचली आहे.  

घरात पैशांची चणचण असून आता एका वेळचं पोट कसं भरायचं हा प्रश्न  रिओलाही पडला होता. सध्याच्या घडीला घरची परिस्थिती फारच बिकट आहे. अशात मिळेत ते काम करण्याची इच्छाशक्ती त्याने दाखवली त्यानुसार सायकलवरून 20-24 किमी उन्हातान्हात तो फूड डिलिव्हरी करतो आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून तो त्याचा चरितार्थ चालवत आहे.

Web Title: Olympic medallist Ryo Miyake turns to delivery boy for money-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.