ओली यांचा शपथविधी
By Admin | Updated: October 12, 2015 23:41 IST2015-10-12T23:41:54+5:302015-10-12T23:41:54+5:30
प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते के. पी. शर्मा ओली यांनी सोमवारी नेपाळचे ३८ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ओली छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने मंगळवारी पंतप्रधानपदी निवडून आले होते.

ओली यांचा शपथविधी
काठमांडू : प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते के. पी. शर्मा ओली यांनी सोमवारी नेपाळचे ३८ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ओली छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने मंगळवारी पंतप्रधानपदी निवडून आले होते. राष्ट्राध्यक्ष राम बरन यादव यांनी ओली यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ओली यांनी दोन उपपंतप्रधान व पाच मंत्र्यांचे एक छोटे मंत्रिमंडळ स्थापन केले.
बिजयकुमार गच्छादर आणि कमल थापा यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली. ओली यांना दिलेल्या पाठिंब्याचे बक्षीस म्हणून त्यांना उपपंतप्रधानपदाचे बक्षीस मिळाले.