फ्रान्समध्ये ओलिसांची सुटका

By Admin | Updated: November 25, 2015 23:53 IST2015-11-25T23:53:10+5:302015-11-25T23:53:10+5:30

फ्रान्सच्या रुबेक्स शहरात ओलिस ठेवण्यात आलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ओलिसनाट्य घडवून आणणारा संशयित मृतावस्थेत आढळून आला. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Oleg release in France | फ्रान्समध्ये ओलिसांची सुटका

फ्रान्समध्ये ओलिसांची सुटका

पॅरिस : फ्रान्सच्या रुबेक्स शहरात ओलिस ठेवण्यात आलेल्या लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ओलिसनाट्य घडवून आणणारा संशयित मृतावस्थेत आढळून आला. स्थानिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मंगळवारी रात्री हे नाट्य घडले. पोलिसांनी सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली. यावेळी अपहरणकर्त्याने पोलिसांवर गोळीबार केला, असे नोर्द क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या वसाहतीत लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते, तेथे एका संशयिताचा मृतदेह आढळून आला, तसेच घटनास्थळी एक रायफलही मिळाली. एका संशयिताला जेरबंद करण्यात यश आले, तर इतर फरार झाले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Oleg release in France