जगातील सर्वात जुने कुराण ब्रिटनमध्ये?
By Admin | Updated: July 23, 2015 00:02 IST2015-07-23T00:02:30+5:302015-07-23T00:02:30+5:30
मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र ग्रंथाची, म्हणजे कुराणाची सर्वात जुनी प्रत बर्मिंगहॅम विद्यापीठात असल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्बन डेटिंग

जगातील सर्वात जुने कुराण ब्रिटनमध्ये?
लंडन : मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र ग्रंथाची, म्हणजे कुराणाची सर्वात जुनी प्रत बर्मिंगहॅम विद्यापीठात असल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्बन डेटिंग पद्धतीद्वारा या प्रतीचे आयुष्य मोजल्यानंतर ती १३७० वर्षे जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. ही प्रत लिहिणारी व्यक्ती प्रेषित मोहंमद पैगंबरांना भेटली असण्याची शक्यताही यानंतर व्यक्त होत आहे.
कुराणाची ही प्रत गं्रथालयामध्ये मध्यपूर्वेतील प्राचीन कागदपत्रे आणि गं्रथांसमवेत तशीच ठेवली गेली होती. त्यामुळे त्याकडे इतकी वर्षे दुर्लक्ष झाले होते. मात्र अल्बा फेदेली या पीएच.डी. करणाऱ्या संशोधकाचे त्याकडे लक्ष गेले. संशोधन करत असताना त्यांनी कुराणाच्या या प्रतीचे कार्बन डेटिंग पद्धतीद्वारे आयुर्मापन करण्याचे ठरविले आणि ही आश्चर्यकारक माहिती उघड झाली. कुराणाचे काही अंश चर्मपत्रावर, पामच्या पानांवर, तसेच दगडांवरही लिहिले गेले आणि नंतर त्याचे पुस्तक रूपात सन ६५० च्या आसपास एकत्रीकरण झाल्याची शक्यता थॉमस यांनी व्यक्त केली आहे. सन ६१० ते ६३२ या काळामध्ये पे्रषित पैगंबरांना साक्षात्कार प्राप्त झाला व त्यातून कुराणाची निर्मिती झाली असे मानले जाते. (वृत्तसंस्था)