शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! सौदीच्या राजपुत्राने दोन दिवसांत गमावले तब्बल सात हजार 800 कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 16:47 IST

सौदी अरेबियाचे राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांना भ्रष्टाचाराविरोधातील अभियानांतर्गत अटक करण्यात नुकतीच आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या एकूण संपत्तीला तब्बल 7 हजार 800 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

रियाध -  सौदी अरेबियाचे राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांना भ्रष्टाचाराविरोधातील अभियानांतर्गत अटक करण्यात नुकतीच आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या एकूण संपत्तीला तब्बल 7 हजार 800 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तलाल यांच्या अटकेनंतर त्यांची कंपनी असलेल्या  किंग्डम होल्डिंग कंपनीच्या (केएचसी) बाजारमुल्यामध्ये 1.2 अब्जा डॉलरची घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य 19 अब्ज  डॉलरवरून 17.8 अब्ज डॉलरवर  आले आहे.  सोमवारी शेअर बाजारांमध्ये केएचसीचा शेअर गेल्या सहा वर्षांमधील निचांकावर बंद झाला. 2013 सालच्या फोर्ब्सच्या प्रोफाइल नुसार अल्वालीद यांच्याकडे एक मार्बल फिल्ड, 420 खोल्यांचा रियाध पॅलेस, एक खाजगी बोईंग 747 आणि सौदी अरेबियाच्या राजधानीच्या किनाऱ्यावर 120 एकरमध्ये पसरलेला एक रिसॉर्ट आहे.  या रिसॉर्चमध्ये पाच आलिशान बंगले, पाच कृत्रिम तलाव आणि एक छोटा ग्रँड कॅन्यन आहे.  केएचसीमध्ये अल्वालीद यांचे 95 टक्के शेअर आहेत. या हजारो कोटी रुपयांच्या भांडवलाखेरीज सौदी अरेबियातील त्यांची अन्य स्थावर संपत्ती, जगभरातील गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक, मध्य पूर्वेतून आलेली गुंतवणूक, विमान, यॉट आणि ज्वेलरी यांच्यासोबत अन्य संपत्तीचा समावेश आहे.   सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्यांमध्ये  ट्विटर, अ‍ॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. शक्तिशाली नॅशनल गार्डसचे प्रमुख, वित्तमंत्री व इतर बड्या पदाधिका-यांचीही हकालपट्टी करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात सलमान यांच्या अध्यक्षतेखाली सौदी सम्राटांनी भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती. संशयितांनी देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी त्यांची खासगी विमानेही जप्त करण्यात आली आहेत. सत्तेसाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे सौदी नॅशनल गार्डचे प्रमुख मुतैब बिन अब्दुल्लाह यांनाही बरखास्त करण्यात आले आहे. नौदलाचे प्रमुख आणि आर्थिक विषयांचे मंत्री यांनाही हटविण्यात आले आहे. या घटनाक्रमाने देश हादरून गेला आहे. एका आदेशात म्हटले आहे की, भ्रष्टाचारविरोधी नव्या आयोगाच्या स्थापनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आयोगाचे प्रमुख वली अहद शहजादे (क्राउन प्रिंस) मोहम्मद बिन सलमान हे आहेत.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाCorruptionभ्रष्टाचार