महिला वार्ताहरांनाच ओबामा यांची उत्तरे
By Admin | Updated: December 22, 2014 02:55 IST2014-12-22T02:55:00+5:302014-12-22T02:55:00+5:30
अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मावळत्या वर्षातील शेवटच्या पत्रकार परिषदेत महिला वार्ताहरांच्याच प्रश्नांना उत्तरे दिली व पुरुष वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याकडे दुर्लक्ष केले.

महिला वार्ताहरांनाच ओबामा यांची उत्तरे
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी मावळत्या वर्षातील शेवटच्या पत्रकार परिषदेत महिला वार्ताहरांच्याच प्रश्नांना उत्तरे दिली व पुरुष वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याकडे दुर्लक्ष केले. व्हाईट हाऊसच्या इतिहासात ही पत्रकार परिषद आगळीवेगळी ठरली आणि असे करण्याचे कारण देण्यात आले ते म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमांचे वार्तांकनाचे कठीण काम किती महिला करतात यावर आम्हाला भर द्यायचा होता.
शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत स्वत: बराक ओबामा यांनी फक्त महिलांनीच प्रश्न विचारावा, असे म्हटले. त्यांचे असे म्हणणे हेतुपूर्वक होते. ओबामांना प्रश्न विचारणाऱ्या सर्व आठही वार्ताहर या महिला व वृत्तपत्रांच्या होत्या. पत्रकार परिषदेनंतर व्हाईट हाऊसचे वृत्त सचिव जोश अर्नेस्ट निवेदनात म्हणाले की, ओबामा यांच्या कार्यक्रमांचे वार्तांकन करण्याचे कठीण काम महिला वार्ताहर करीत असतात ही वस्तुस्थिती आहे. (वृत्तसंस्था)