ओबामा पार्कमध्ये फिरायला गेले
By Admin | Updated: May 24, 2014 04:29 IST2014-05-24T04:29:58+5:302014-05-24T04:29:58+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईटहाऊसमधून बाहेर पडून दुसर्या कार्यालयात कामासाठी जात असताना अचानक आपला मार्ग बदलला आणि ते जवळच्या पार्कात शिरले

ओबामा पार्कमध्ये फिरायला गेले
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईटहाऊसमधून बाहेर पडून दुसर्या कार्यालयात कामासाठी जात असताना अचानक आपला मार्ग बदलला आणि ते जवळच्या पार्कात शिरले. त्यावेळी पार्कात असणार्या नागरिकांना एक वेगळेच ओबामा पाहावयास मिळाले. कोट खांद्यावर टाकून रमत गमत चाललेले अध्यक्ष पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बागेत असणार्या लोकांना अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा आपल्याला भेटतील हे अजिबातच अपेक्षित नव्हते. ओबामा यांनी अगदी सहजतेने पर्यटकांशी गप्पा मारल्या, दुकानदारांची विचारपूस केली आणि लहान मुलांचे कौतुक केले. एका महिलेने राष्टÑाध्यक्षांशाी हस्तांदोलन करताना तुम्ही खरेच राष्टÑाध्यक्ष ओबामा आहात काय? असे विचारले. हो मी खराच बराक ओबामा आहे, असे उत्तर अध्यक्षांनी दिले. (वृत्तसंस्था) आणखी एका महिलेने राष्टÑाध्यक्षांसोबत छायाचित्र घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यालाही ओबामा यांनी मान्यता दिली. ती महिला म्हणाली लोकांना वाटेल, तुमच्या मेणाच्या पुतळ्यासोबतचा हा फोटो आहे. एवढे होईपर्यंत पत्रकार मागे लागले. ते पाहा अस्वल मोकळे सुटले आहे, असे ओबामा यांनी त्यांना सांगितले.