जनजागृतीसाठी ओबामांची अलास्कातील हिमनदीला भेट
By Admin | Updated: September 2, 2015 23:24 IST2015-09-02T23:24:17+5:302015-09-02T23:24:17+5:30
हवामान बदलाविषयी लोकांत जागृती घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलास्कातील हिमनदीला भेट दिली. ही हिमनदी वरचेवर आकसत चालली आहे.

जनजागृतीसाठी ओबामांची अलास्कातील हिमनदीला भेट
अलास्का : हवामान बदलाविषयी लोकांत जागृती घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलास्कातील हिमनदीला भेट दिली. ही हिमनदी वरचेवर आकसत चालली आहे.
ओबामा मंगळवारी दक्षिण अलास्कातील केनई जोड्स अभयारण्यात गेले आणि एग्जिट हिमनदीच्या पार्श्वभूमीवर उभे राहिले. त्यांनी ही विशाल हिमनदी १८१५ पासून सातत्याने आकसत चालल्याचे संदेश देणाऱ्या फलकाकडे अंगुलीनिर्देशही केला. गेल्या काही वर्षांत ही हिमनदी दीड मैल आकसली आहे. हिमनद्यांच्या आकसण्याची गती दरवर्षी वाढत आहे. हवामान बदलामुळे बर्फ कमी होत असून, उष्णता वाढत आहे. तसेच उष्णतेचा कालावधीही वाढत चालला आहे. अभयारण्यातील झाडांवर याचा परिणाम झाला असून, बर्फ वितळल्यामुळे समुद्राचा जलस्तरही वाढू लागला आहे.
आमच्या भावी पिढ्यांना हे निसर्गसौंदर्य पाहता यावे याची खबरदारी आम्ही घेऊ इच्छितो. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी घरगुती कार्बन उत्सर्जन घटविण्याबाबतचे नियम आणि एका जागतिक कराराला पाठिंबा मिळविण्याच्या उद्देशाने ओबामा अलास्कात आले आहेत. (वृत्तसंस्था)