ओबामांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक

By Admin | Updated: April 16, 2015 23:59 IST2015-04-16T23:59:31+5:302015-04-16T23:59:31+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टाईम’ पत्रिकेत त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे गुरुवारी आभार मानले आहेत.

Obama praised Narendra Modi | ओबामांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक

ओबामांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक

टोरँटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टाईम’ पत्रिकेत त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे गुरुवारी आभार मानले आहेत. ‘‘ओबामा यांचे शब्द हृदयाला भिडणारे असून प्रेरणादायी आहेत’’, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना टिष्ट्वटरवर व्यक्त केल्या.
तत्पूर्वी ‘इंडियाज रिफॉर्मर इन चीफ’ (भारताचे मुख्य सुधारक) या मथळ्याच्या लेखात ओबामांनी मोदी यांचा ‘गरिबी ते पंतप्रधान’ हा प्रवास भारताच्या उदयाची क्षमता व गतिशीलतेचे निदर्शक असल्याचे म्हटले. ओबामा लिहितात, ‘‘मोदी हे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे नेते आहेत व गरिबीपासून पंतप्रधानपदापर्यंतचा जीवनप्रवास हा भारताची उदयक्षमता व गतिशीलतेचे निदर्शक आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Obama praised Narendra Modi