ओबामांनी 106 वर्षाच्या आजीसोबत केला डान्स
By Admin | Updated: February 23, 2016 15:48 IST2016-02-23T14:46:33+5:302016-02-23T15:48:09+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा थक्क झाले जेव्हा 106 वर्षांच्या वर्जिनिया मॅकलॉरिन यांनी त्यांच्यासमोर डान्स केला
ओबामांनी 106 वर्षाच्या आजीसोबत केला डान्स
>ऑनलाइन लोकमत-
वॉशिंग्टन, दि. 23- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा थक्क झाले जेव्हा 106 वर्षांच्या आजीने त्यांच्यासमोर डान्स केला. युरोन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 106 वर्षाच्या वर्जिनिया मॅकलॉरिन ओबामांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आल्या होत्या. ओबामांची भेट झाल्याचा त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी ओबामांची पत्नी मिशेलदेखील तिथे उपस्थित होत्या. आजींना डान्स करताना पाहून ओबामा आणि मिशेल यांनीदेखील त्यांच्यासोबत डान्स केला. अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला भेटून मला खुप आनंद झाला असल्याची भावनाही त्यांनी ओबामा आणि मिशेल यांना बोलून दाखवली.