शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवून जिवे मारलं जातंय; न्यूयॉर्कमधल्या नर्सच्या दाव्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 11:16 IST

न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १२ हजार बळी; हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप

न्यूयॉर्क: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून याचा सर्वात मोठा उटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जवळपास ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. त्यातच न्यूयॉर्कमधील रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकेनं केलेल्या एका दाव्यानं जगभरात खळबळ माजली आहे. कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवून त्यांना जिवे मारलं जात असल्याचा दावा एका परिचारिकेनं केला आहे.कोरोना संकटात रुग्णांची सुश्रूषा करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या परिचारिकेनं तिचा धक्कादायक अनुभव मैत्रिणीच्या माध्यमातून जगापुढे आणला आहे. न्यूयॉर्कच्या रुग्णालयामधला प्रकार एखाद्या हॉरर चित्रपटात शोभण्यासारखा असल्याचं तिनं म्हटलं आहे. कोरोनाचं संकट गंभीर आहेच. मात्र न्यूयॉर्कमधल्या रुग्णालयात ज्या पद्धतीनं हे संकट हाताळलं जातं आहे, ते जास्त गंभीर असल्याचं परिचारिकेनं म्हटलं आहे. 'डेली मेल'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी न्यूयॉर्कच्या रुग्णालयात काम करत असलेल्या परिचारिकेनं रुग्णांच्या नातेवाईकांना अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तुमचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींपैकी कोणालाही कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केलं जाणार असेल, तर त्यांना व्हेंटिलेटर ठेवलं जाणार नाही, याची पुरेशी खात्री करून घ्या, असं कळकळीचं आवाहन परिचारिकेनं तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून केलं आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आलं आहे. 'मी तिचा (परिचारिकेचा) आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. तिनं मला सांगितलेल्या धक्कादायक घटना मी तुम्हाला सांगत आहे. न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरू हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं असं तिला वाटतं. तिथे (रुग्णालयात) सुरू असलेला हलगर्जीपणा तिनं याआधी कधीही पाहिलेला नाही. कोणालाच रुग्णांची चिंता नाही. ते अतिशय थंडपणे काम करत आहेत आणि त्यांना रुग्णांची जराही चिंता नाही. एका आंधळ्यानं दुसऱ्याला दिशा दाखवावी, तसा प्रकार तिथे सुरू आहे,' अशी धक्कादायक माहिती परिचारिकेनं तिच्या मैत्रिणीला दिली आहे.'रुग्ण आजारी आहेत. मात्र त्यांना रुग्णालयाकडून मदत केली जात नाही. त्यांची हत्या केली जात आहे,' असं परिचारिकेच्या मैत्रिणीनं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 'परिचारिका म्हणून काम करत असलेल्या माझ्या मैत्रिणीनं रुग्णालयात सुरू असलेल्या प्रकारासाठी थेट हत्या हा शब्द वापरला. कोरोनानं थैमान घातलेल्या न्यूयॉर्कला मदत करण्याच्या हेतूनं मैत्रीण तिथे गेली होती. मात्र तिथे तिनं पाहिलेला प्रकार धक्कादायक आहे,' असा खळबळजनक दावा व्हिडीओमधून करण्यात आला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ५९ हजारहून अधिक जणांचा बळी गेला असून यातले १२ हजारपेक्षा अधिक जण न्यूयॉर्कमधले आहेत."डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम झालं नाही"'ही' पक्षपाती आणि वादग्रस्त विधानं नवीन नाहीत; अमेरिकन सरकारी संस्थेचा रिपोर्ट भारताने फेटाळला'राहुल गांधींकडून निर्लज्जपणे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या