'हिंदू, शीखांवर केलेले अत्याचार जगानं पाहिलेत,' उपदेश देण्यास आलेल्या पाकची भारताकडून कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 03:22 PM2022-06-06T15:22:20+5:302022-06-06T15:24:36+5:30

मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विधानाचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले होते.

nupur sharma prophet muhammad comment issue india gives stern message to pakistan india external affairs ministry | 'हिंदू, शीखांवर केलेले अत्याचार जगानं पाहिलेत,' उपदेश देण्यास आलेल्या पाकची भारताकडून कानउघडणी

'हिंदू, शीखांवर केलेले अत्याचार जगानं पाहिलेत,' उपदेश देण्यास आलेल्या पाकची भारताकडून कानउघडणी

Next

मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दिल्लीतील भाजपा नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पसंख्यांकावर अत्याचार करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या पाकिस्ताननंही यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. तुमचा रकॉर्ड जगनं पाहिला आहे, असं म्हणत भारतानंपाकिस्तानचं वक्तव्य फेटाळून लावलं.

आम्ही पाकिस्तानकडून आलेल्या वक्तव्यांची आणि टीकांची दखल घेतली आहे. अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्याचा पाकिस्तानचा रेकॉर्ड राहिला आहे. त्याबाबत संपूर्ण जगाला माहित आहे आणि हिंदू, शीख, ईसाई आणि अहमदींवर झालेले अत्याचार त्यांची पाहिल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जारी केलेल्या निवेदनाद्वारे म्हटलंय.

“पाकिस्ताननं कसं व्यवस्थेच्या मदतीनं अल्पसंख्यांकावर अत्याचार केले आहेत हे जगानं पाहिलं आहे. भारतात सर्व धर्मांचा सन्मान केला आहे. या ठिकाणी पाकिस्तानसारखी स्थिती नाही, की घार्मिक आधारावर अत्याचार करणाऱ्या लोकांना सन्मानित करण्यात येईल आणि त्यांच्या नावावर स्मारक तयार केलं जाईल. पाकिस्तानात हे होत आलं आहे. पाकिस्ताननं आपल्या देशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर लक्ष द्यावं. त्यांनी दुसऱ्या देशाविरोधात प्रपोगंडा पसरवणं आणि सामाजिक एकोपा तोडणाऱ्या गोष्टी करू नये,” असंही ते म्हणाले.

पक्षातून हकालपट्टी
भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील एका चर्चेत एका धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हिंसक घटना घडल्या. तसेच वादग्रस्त ट्वीटमुळे भाजप नेते नवीनकुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भाजपच्या शिस्तपालन समितीने म्हटले की, शर्मा यांनी एका धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करून भाजपच्या ध्येयधोरणांचा भंग केला. त्यासंदर्भात पक्षांतर्गत चौकशी होणार आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, कोणताही धर्म, त्यातील व्यक्तींबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारांचा भाजप निषेध करतो. भाजप सर्व धर्मांचा आदर करतो.

Web Title: nupur sharma prophet muhammad comment issue india gives stern message to pakistan india external affairs ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.