हज दुर्घटनेतील भारतीय मृतांची संख्या ४५ वर
By Admin | Updated: September 28, 2015 23:46 IST2015-09-28T23:46:05+5:302015-09-28T23:46:05+5:30
हज यात्रेचील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या आणखी १० नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची ओळख पटल्यानंतर या दुर्घटनेत प्राण गमावणाऱ्या भारतीय यात्रेकरूंची संख्या सोमवारी

हज दुर्घटनेतील भारतीय मृतांची संख्या ४५ वर
मिना : हज यात्रेचील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या आणखी १० नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची ओळख पटल्यानंतर या दुर्घटनेत प्राण गमावणाऱ्या भारतीय यात्रेकरूंची संख्या सोमवारी वाढून ४५ झाली. ५० जखमी भारतीयांवर उपचार सुरू आहेत.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वट करून चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या आता ४५ झाल्याचे म्हटले आहे. हज चेंगराचेंगरीतील बळींची संख्या १०९० झाली असल्याचेही त्या म्हणाल्या.
सौदी प्रशासनाने मृतांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.