शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 20:09 IST

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन क्वचितच दुसऱ्या देशात जात आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांची अलास्का येथे भेट होणार आहे. ७ वर्षांनी हे दोन्ही नेते आमने-सामने चर्चा करणार आहेत. अँकरेजमधील एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन मिलिट्री बेस येथे ही भेट नियोजित आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये ४ तास चर्चा होईल. यावेळी एकाच खोलीतून ७००० अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवले जाईल. रशियाकडे ४३१० न्यूक्लिअर वॉरहेड आणि अमेरिकेकडे ३९०० अण्वस्त्रे आहेत अशी माहिती नागासाकी एटॉमिक रिसर्च सेंटरकडे आहे. 

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन क्वचितच दुसऱ्या देशात जात आहेत. अलास्का येथे पुतिन यांच्या सुरक्षेसाठी अनेक लेअर आहेत. पुतिन यांच्या सुरक्षेसाठी रशियाच्या फेडरल प्रोटेक्टिव सर्व्हिसची स्पेशल यूनिट तैनात असतील. पुतिन यांच्या सुरक्षा रक्षकांच्या हातात अनेक सुटकेस असतील परंतु ते सामान्य सुटकेस नाही. हे सर्व सुटकेस बुलेटप्रूफ प्रोटेक्शनसह असतील, जेणेकरून पुतिन यांच्यावर फायरिंग होण्याच्या स्थितीत त्याचा शील्डप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. 

रशियाच्या नौदल अधिकाऱ्याच्या हाती अण्वस्त्र ब्रीफकेस

पुतिन यांच्यासोबत रशियाच्या अण्वस्त्रे ब्रीफकेस चेगेटही असते. त्याचे नाव काकेशस पर्वतांमधील माउंट चेगेट यावर ठेवले गेले आहे. ही ब्रीफकेस दरवेळी पुतिन यांच्यासोबत असते. परंतु अगदी कमी वेळा ती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रशियाचे नौदल अधिकारी ते हाती घेऊन फिरतात. त्यात एक कम्युनिकेशन डिवाइस असतो, ज्यातून कधीही न्यूक्लिअर हल्ला लॉन्च करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. या ब्रीफकेसला रिमोट ब्लास्टपासून वाचवण्यासाठी जॅमरही लावलेले असतात. 

लॉन्च कोडमधून ट्रम्प देऊ शकतात आदेश

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही अशीच ब्रीफकेस असते. जी न्यूक्लिअर फुटबॉल नावाने ओळखली जाते. अधिकृतपणे त्याला प्रेसिडेंशियल इमरजेन्सी सॅचेल म्हटले जाते. यातून राष्ट्रपती व्हाईट हाऊस सिच्युएशन रूम किंवा प्रेसिडेंशियल इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला अणु हल्ल्यासाठी आदेश देऊ शकतात. न्यूक्लिअर फुटबॉलमध्ये बिस्किटसारखे दिसणारे एक कार्ड असते ज्यावर न्यूक्लिअर लॉन्च कोड लिहिलेले असतात. पुतिन-ट्रम्प या भेटीसाठी हायटेक सुरक्षा यंत्रणा आहे. त्याला रशियन आणि अमेरिकन विशेष सैन्याचे मजबूत सुरक्षा कवच असेल. अँकोरेजजवळील हा मिलिट्री बेस अमेरिकन हवाई दल, लष्कर, नौदल आणि मरीन कॉर्प्स तसेच नॅशनल गार्ड्समनच्या सैनिकांनी भरलेला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाAmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया