एनएसए स्तरीय चर्चा: भारत-पाक भूमिकेवर ठाम
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:09+5:302015-08-20T22:10:09+5:30
नवी दिल्ली : पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिज यांच्या भेटीचे आमंत्रण मिळणाऱ्या जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी नेत्यांना अचानक अटक आणि सुटकेच्या घटनाक्रमामुळे उभय देशांदरम्यान एनएसएस्तरीय चर्चेबाबत थोडी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असली तरी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार चर्चा पुढे नेण्याच्या भूमिकेवर दोघेही ठाम आहेत.

एनएसए स्तरीय चर्चा: भारत-पाक भूमिकेवर ठाम
न ी दिल्ली : पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजिज यांच्या भेटीचे आमंत्रण मिळणाऱ्या जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी नेत्यांना अचानक अटक आणि सुटकेच्या घटनाक्रमामुळे उभय देशांदरम्यान एनएसएस्तरीय चर्चेबाबत थोडी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असली तरी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार चर्चा पुढे नेण्याच्या भूमिकेवर दोघेही ठाम आहेत.पाकिस्तानी उच्चायोगाने फुटीरवाद्यांना अजिज यांच्या भेटीचे आमंत्रण दिल्याने भारत नाराज आहे. परंतु अशा बैठका होणे ही सामान्य बाब असल्याचे सांगून पाकने याचे समर्थन केले आहे. तूर्तास एनएसएस्तरीय बैठक होईल असे चित्र आहे. मात्र फुटीरवादी नेत्यांना दिल्लीत येऊन अजिज यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले तर मात्र या चर्चेला वेगळी कलाटणी मिळू शकते,असे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान जेकेएलएफचे प्रमुख यासीन मलिक यांनी पाकिस्तान उच्चायोगात आयोजित बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेतर्फे आपले दोन सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पाठविण्यात येईल.