आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:29 PM2021-05-31T14:29:57+5:302021-05-31T14:31:40+5:30

नुकतेच चीनच्या लोकसंख्येचे आकडे समोर आले होते. यातून चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले होते.

Now three children can be born in China; China changed rules | आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले!

आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले!

Next

बिजिंग - वृद्ध होत चाललेली लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढीचा मंदावलेल्या वेग, यामुळे चिंतित चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता चीन सरकारने परिवार नियोजनाचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार, आता चीनमध्ये कपल्स तीन मुलांना जन्म देऊ शकतील. यापूर्वी येथे केवळ दोन मुलेच जन्माला घालण्याची परवानगी होती. (Now three children can be born in China; China changed rules)

नुकतेच चीनच्या लोकसंख्येचे आकडे समोर आले होते. यातून चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले होते. अशात भविष्याचा विचार करता, चीनने हा निर्णय घेतला आहे. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या पॉलिसीला चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचीही परवानगी मिळाली आहे. अर्थात अनेक दशकांपासून चीनमध्ये सुरू असलेली टू-चाइल्ड पॉलिसी चीनने संपुष्टात आणली आहे.

चीननं दाखवला पाकिस्तानला ठेंगा; इम्रान खान यांना कर्ज माफीसाठी जोडावे लागले हात

चीनला का उचलावे लागले असे पाऊल ? -
चीनने नुकतेच आपल्या लोकसंख्येचे आकडे प्रसिद्ध केले होते. यानुसार, गेल्या दशकात चीनमध्ये मुले जन्माला येण्याच्या वेगाची सरासरी सर्वात कमी होती. याचे कारण चीनमधील टू-चाइल्ड पॉलिसी असल्याचे सांगण्यात आले होते. आकडेवारीनुसार, 2010 ते 2020दरम्यान चीनमधील लोकसंख्या वाढीचा वेग 0.53% एवढा होता. तर वर्ष 2000 ते 2010 दरम्यान हा वेग 0.57% होता. अर्थात गेल्या दोन दशकांत चीनमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. 

एढेच नाही, तर आकडेवारीनुसार, वर्ष 2020मध्ये चीनमध्ये केवळ 12 मिलियन मुलेच जन्माला आली. तर 2016 मध्ये हा  आकडा 18 मिलियनवर होता. म्हणजेच चीनमध्ये 1960 नंतर मुले जन्माला येण्याचे प्रमाणही सर्वात कमी झाले.

CoronaVirus: चीनची आता खैर नाही, कोरोना पूर्णत: मानवनिर्मितच; वैज्ञानिकांना मिळाले महत्वाचे पुरावे

 

Web Title: Now three children can be born in China; China changed rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.