शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 21:59 IST

महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहने इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत.

मध्यपूर्वेतील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर तीन दिवस हल्ले चढवले. यानंतर आता हिजबुल्लाहनेही इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे. हिजबुल्लाहने शुक्रवारी उत्तर इस्रायलवर 140 रॉकेट डागले आहेत. महत्वाचे म्हणजे, हिजबुल्लाहचा नेता हसन नसराल्लाहने इस्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत.

तीन टप्प्यांत डागले रॉकेट -आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, इस्रायली सेन्य आणि दहशतवादी गट हिजबुल्लाह, या दोघांनीही या हल्ल्यांसंदर्भात माहिती दिली आहे. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहिती नुसार, शुक्रवारी दुपारी तीन टप्प्यांत रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यांचे लक्ष लेबनानला लागून असलेल सीमाभागातील ठिकाणे होती. तर, आपण सीमेवरील अनेक ठिकाणांना कत्युशा रॉकेटच्या सहाय्याने लक्ष्य केल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे.

इस्रायली आर्मर्ड ब्रिगेडच्या मुख्यालयालाही करण्यात आले लक्ष्य -हिजबुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेक हवाई संरक्षण तळांना आणि इस्रायली आर्मर्ड ब्रिगेडच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आले. या ठिकाणांवर पहिल्यांदाच हल्ला करण्यात आला आहे. हे रॉकेट दक्षिण लेबनानच्या गावांमध्ये आणि घरांवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाटी डागण्यात आले.

गुरवारी इस्रायलनं केली होती बॉम्बिंग -या घटनेच्या एक दिवस आधीच म्हणजेच गुरुवारीच इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर बॉम्बिंग केली आणि राजधानी बेरूतमध्ये जोरदार स्फोट ऐकू आले. इस्त्रायलने लेबनानच्या हवाई हद्दीत घुसून ही बॉम्बिंग केली. हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरुल्लाह इस्रायलला धमकी देत ​​असताना इस्रायलने हा हवाई हल्ला केला.

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्ध