शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आता 'वीज' WiFi सारखीच मिळणार; घरांत तारांशिवाय लाईट येणार, वायरलेस वीज कशी असेल जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:52 IST

आपल्याकडे वीज ही तारांद्वारे येते, तारांशिवाय वीज पुरवता येत नाही. पण, आता नवीन तंत्रज्ञानामुळे वीज बिनारांची म्हणजेच वायफाय सारखी मिळणार आहे.

आपल्याकडे वीज तारांद्वारे मिळते. तारांशिवाय वीज येत नाही. तारांमधूनच वीज एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते. पण, आता यामध्ये मोठा बदल होणार आहे. कारण आता वीज तारांशिवाय, म्हणजेच वायरलेस पद्धतीने आपल्याला घरात मिळणार आहे. सध्या, आपल्याकडे जसा मोबाईल फोनवर कॉल येतो, इंटरनेट चालते किंवा मोबाइल वायरलेस चार्ज होतो, त्याच पद्धतीने वीजही हवेतून पोहोचवता येईल, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. हे ऐकायला जरी अवघड वाटत असले तरी, फिनलँड देशाने हे प्रत्यक्षात करून दाखवले आहे.

फिनलँडमध्ये वायरलेस पॉवर ट्रान्सफरवर वेगाने संशोधन सुरू आहे. केबल, प्लग किंवा सॉकेटशिवाय वीज पाठवता यावी, असे शास्त्रज्ञांचे उद्दिष्ट आहे. यासाठी आल्टो विद्यापीठ, हेलसिंकी विद्यापीठ आणि औलू विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जात आहे.

माझ्या यशावर हे लोक जळतात..; भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना ओवैसींचे प्रत्युत्तर

२०२५-२६ दरम्यान, या क्षेत्रात  महत्त्वाचे यश मिळाले. ध्वनीतरंग, रेडिओ फ्रिक्वेन्सी, लेझर आणि मॅग्नेटिक फील्ड्स यांच्या मदतीने हवेतून वीज पाठवण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.

वायरलेस चार्जिंगमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा वापर होतो. एका बाजूने ऊर्जा पाठवली जाते आणि दुसऱ्या बाजूने ती ऊर्जा घेतली जाते. फिनलँडमधील संशोधनामुळे आता डिव्हाइस अचूक ठिकाणी ठेवण्याची गरज नाही. हलत असतानाही डिव्हाइस चार्ज होऊ शकते.

लॅबच्या बाहेरही हे तंत्रज्ञान यशस्वी ठरत आहे. छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रोबोट्स आणि सेन्सर्स हवेतून वीज घेताना दाखवण्यात आले आहेत. काही प्रयोगांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त कार्यक्षमता मिळाली आहे. २०२५ मध्ये टाईम मॅगझीनने फिनलँडच्या या तंत्रज्ञानाला सर्वोत्तम शोधांमध्ये स्थान दिले.

तरीही अजून घरांमध्ये पूर्णपणे वायरलेस वीज पोहोचायला वेळ लागणार आहे. सध्या हे तंत्रज्ञान कमी अंतर आणि कमी वीज क्षमतेसाठी अधिक उपयुक्त आहे. मोठ्या अंतरासाठी आणि जास्त वीज वापरासाठी अजून संशोधनाची गरज आहे. मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास सुरू आहे.

तज्ञांच्या मते, घरांमध्ये, गाड्यांमध्ये आणि संपूर्ण शहरांमध्ये वायरलेस वीज पोहोचण्यासाठी अजून काही वर्षे लागणार आहेत. पण भविष्यात तारांशिवाय वीज ही गोष्ट नक्कीच वास्तवात येऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Wireless Electricity Coming Soon: Power Without Wires, Like WiFi

Web Summary : Finland is pioneering wireless power transfer. Scientists aim to transmit electricity without cables, using radio frequencies, lasers, and magnetic fields. Early tests show promise for charging devices remotely, but widespread home use needs more research on safety and efficiency.
टॅग्स :electricityवीजWiFiवायफाय