शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आता चीनचा खेळ सुरु झाला! पेट्रोलिअम उत्पादनांच्या निर्यातीवर लादले निर्बंध; जगाला वेठीस धरण्यास सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:35 IST

China Export Curbs Refined Oil: मध्य पूर्वेतील युद्धाच्या भडक्यामुळे चीनने रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर.

मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फायदा उठवत चीनने एक मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. चीनने आपल्या रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे आधीच कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्सच्या पार गेले असताना, चीनच्या या निर्णयामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ पाहता, चीनने आपल्या देशांतर्गत साठ्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. रिफाइंड तेल, डिझेल आणि विमानाचे इंधन यांची निर्यात कमी करून चीन आपली 'इंधन सुरक्षा' मजबूत करत आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे येत्या काळात कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यास आपल्या देशात टंचाई भासू नये, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

IEA च्या नियमांपासून मुक्तचीन International Energy Agency (IEA) चा पूर्णवेळ सदस्य नाही. तो केवळ 'असोसिएट सदस्य' आहे. त्यामुळे जेव्हा अमेरिका किंवा इतर पाश्चात्य देश जागतिक बाजारपेठेतील किमती कमी करण्यासाठी आपल्या साठ्यातून तेल सोडण्याचे आवाहन करतात, तेव्हा चीन ते मान्य करण्यास बांधील नसतो. तो स्वतःच्या फायद्यानुसार साठा करून ठेवू शकतो. नेमका याचाच फायदा चीनने घेतला आहे.

इराणसोबतचे धोरणात्मक संबंधचीन हा इराणच्या तेलाचा मोठा ग्राहक आहे. अमेरिकेने इराणवर कितीही निर्बंध लादले तरी चीन तिथून तेल खरेदी करत असतो. आता युद्धाच्या स्थितीत इराणकडून मिळणारा पुरवठा अनिश्चित झाल्यामुळे, चीनने आधीच आयात केलेल्या तेलाचे शुद्धीकरण करून त्याचे साठे सुरक्षित करण्यास सुरुवात केली आहे.

जागतिक बाजारावर परिणामचीन हा जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण केंद्रांपैकी एक आहे. चीनने निर्यात घटवल्यामुळे आशिया आणि युरोपातील देशांना डिझेल आणि इतर इंधनांसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते. याचा थेट परिणाम जागतिक महागाईवर होण्याची शक्यता आहे. आधीच अमेरिकेने रशियन तेलाला तात्पुरती मुभा दिली असताना, चीनच्या या नव्या निर्बंधांमुळे जागतिक राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.

टॅग्स :chinaचीनIranइराणCrude Oilखनिज तेलPetrolपेट्रोलDieselडिझेल