शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 08:29 IST

4 जुलै रोजी चिनी जहाज व्हिएतनामच्या उत्तरेकडील व्हँगार्ड किना-यावर पोहोचले आणि तेव्हापासून तेथे सतत गस्त घालत आहे.

वॉशिंग्टनः पूर्व लडाखमध्ये भारताशी झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चीनला समुद्रात अमेरिकेच्या घातक युद्धनौका आणि लडाखच्या पर्वतराजीत भारतानं आपली एकसो एक लढाऊ विमानं तैनात करून चीनला घेरलं होतं. त्यानंतर चिनी सैन्य लडाख सीमेवरच्या वादग्रस्त क्षेत्रातून २ किलोमीटर मागे गेले आहे. भारतासोबतचा वाद शांत होत नाही, तोच चीन आता व्हिएतनामला उकसावू लागला आहे. अलीकडेच चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजाला दक्षिण चीन समुद्रातील व्हॅंगार्ड किना-यावर पाहिले गेले, या भागावरून व्हिएतनामचा चीनशी वाद सुरू आहे.सोमवारी व्हिएतनामच्या तेलाच्या क्षेत्राच्या 30 नॉटिकल मैलांच्या अंतरावर दक्षिण चीन समुद्रात चीनी तटरक्षक दलाचे जहाज 5402 पाहिले गेले. हे चिनी जहाज ब्लॉक क्रमांक 06.01 जवळ दिसले. जे व्हिएतनामने रशियन तेल कंपनी रोसनेफ्टला दिलेलं आहे. गेल्या आठवड्याभरात व्हिएतनामच्या भागात चिनी जहाजे दिसण्याची ही दुसरी घटना आहे. चीनच्या या पावलामुळे दक्षिण चीन समुद्रातील दोन आशियाई देशांमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. चिनी कोस्ट गार्ड जहाज हानान प्रांतातील सान्या बंदरातून १ जुलै रोजी निघाले. ते 2 जुलै रोजी चीनच्या सर्वात मोठ्या कृत्रिम बेटावरील सुबी रीफवर थांबले होते. 4 जुलै रोजी चिनी जहाज व्हिएतनामच्या उत्तरेकडील व्हँगार्ड किना-यावर पोहोचले आणि तेव्हापासून तेथे सतत गस्त घालत आहे. व्हिएतनाम सरकारकडून सध्या या जहाजाच्या उपस्थितीबद्दल कोणतेही विधान झाले नाही.पारासेल बेटाजवळ केला होता युद्धाभ्यासगेल्या आठवड्यात चीनने व्हिएतनाम आणि चीनमधील आणखी एक वादग्रस्त क्षेत्र असलेल्या पारासेल बेटाजवळ युद्धसराव केला होता. व्हिएतनामने यावर तीव्र निषेध व्यक्त केला होता. चीन दक्षिण चीन समुद्रात आक्रमक भूमिका घेत आहे. यामागील हेतू असा आहे की, या क्षेत्रातील व्यावसायिक हालचाली आंतरराष्ट्रीय कंपन्यांद्वारे नव्हे, तर केवळ चिनी भागीदारांनीच केल्या जाव्यात ही चीनची मनीषा आहे. 

टॅग्स :south china seaदक्षिण चिनी समुद्र