शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता या देशाने केली पाकिस्तानी दहशतवाद्यांवर एअरस्ट्राइक, अनेक दहशतवादी ठार

By बाळकृष्ण परब | Updated: January 11, 2021 18:39 IST

Afghanistan Airstrike News : अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये १४ दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देनिमरोज प्रांतामध्ये शनिवारी रात्री करण्यात आलेल्या एअरस्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलेदरम्यान, या हल्ल्यात ठार झालेल्यांचे नातेवाईक न्यायाची मागणी करत १८ मृतदेह घेऊन निमजोर प्रांताची राजधानी असलेल्या जारंज येथे पोहोचले आहेतसंयुक्त राष्ट्रांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानमधील सुमारे सहा ते साडे सहा हजार दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेत

काबूल - दोन वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ३०० दहशतवादी मारले गेल्याची कबुली पाकिस्तानच्या एका माजी राजनैतिक अधिकाऱ्याने दिली होती. दरम्यान, आता अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये १४ दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे तर उर्वरित पाच दहशतवादी हे तालिबानी असल्याचे समोर आले आहे.

 या हवाई हल्ल्यात १८ अफगाण नागरिकही मारले गेले आहेत. मारले गेलेले सर्व नागरिक एकाच कुटुंबातील लोक असल्याचे अफगाणिस्तानमधील गझनीमध्ये प्रांतीय परिषदेचे प्रमुख बाज मोहम्मद नासिर यांनी सांगितले. हा हल्ला खशारोड जिल्ह्यातील मुनाजारी गावाला लक्ष्य करून करण्यात आला. मारल्या गेलेल्या लोकांमध्ये आठ मुले, सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.दरम्यान, निमरोज प्रांतामध्ये शनिवारी रात्री करण्यात आलेल्या एअरस्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, असा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. अफगाणिस्तान एअरफोर्सनेही एक पत्रक प्रसिद्ध करून शनिवारी तालिबानींच्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचा दावा केला होता. दरम्यान, या हल्ल्यात ठार झालेल्यांचे नातेवाईक न्यायाची मागणी करत १८ मृतदेह घेऊन निमजोर प्रांताची राजधानी असलेल्या जारंज येथे पोहोचले आहेत.संयुक्त राष्ट्रांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानमधील सुमारे सहा ते साडे सहा हजार दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहेत. यापैकी अनेक दहशतवाद्यांचा संबंध हा तहरीक ए तालिबान पाकिस्तानशी आहे. संयुक्त राष्ट्रांनी हे दहशतवादी पाकिस्तान अफगाणिस्तानसाठी धोका असल्याचे म्हटले होते.

टॅग्स :TerrorismदहशतवादAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी