शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान इम्रान खान यांना विदेशी निधी प्रकरणात नोटीस, हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 05:57 IST

पाकिस्तानच्या माध्यमांत आलेल्या वृत्तांमध्ये याबाबतची माहिती दिलेली आहे. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे असंतुष्ट संस्थापक सदस्य अकबर एस. बाबर यांच्याकडून पक्षाची कागदपत्रे दडवून ठेवल्याच्या तपास समितीच्या निर्णयाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही नोटीस जारी केली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पार्टी तसेच आपल्या तपास समितीला नोटीस जारी करून २२ मार्च रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. विदेशातून मिळालेल्या निधीची कागदपत्रे दडवून ठेवल्याच्या प्रकरणात त्यांची बाजू स्पष्ट करण्यास सांगितले आहे.पाकिस्तानच्या माध्यमांत आलेल्या वृत्तांमध्ये याबाबतची माहिती दिलेली आहे. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे असंतुष्ट संस्थापक सदस्य अकबर एस. बाबर यांच्याकडून पक्षाची कागदपत्रे दडवून ठेवल्याच्या तपास समितीच्या निर्णयाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही नोटीस जारी केली आहे. न्या. (सेवानिवृत्त) इरशाद कैसर यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या तीन सदस्यीय निवडणूक आयोगाच्या पीठाने तक्रारीवर सुनावणी केली व नोटीस जारी केली. बाबर यांचे वकील अहमद हसन शाह यांनी सत्ताधारी पक्षाची खाती गुप्त ठेवण्याच्या तपास समितीच्या निर्णयांना आव्हान दिले होते. त्यांनी कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर केला.कायद्यानुसार याचिकाकर्त्याला दस्तावेज प्राप्त करण्याचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी म्हटले आहे की, दस्तावेज गुप्त ठेवून निवडणूक आयोगाची तपास समिती तपासाच्या अटींचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे दोहोंच्या उपस्थितीत तपास करणे आवश्यक आहे. त्यांनी म्हटले आहे की, समितीच्या गोपनीयतेचा आदेश बेकायदेशीर आहे.

...तर अब्जावधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश- पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना याचिकाकर्ते बाबर यांनी आरोप केला आहे की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भीती आहे की, बँकेची गोपनीय माहिती खुली झाली तर त्यांच्या पक्षाच्या खात्यात अवैधरित्या आलेल्या अब्जावधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश होईल. - विशेष म्हणजे, बाबर यांनी पक्षातील भ्रष्टाचार व अन्य मुद्द्यांवर इम्रान खान यांच्याशी मतभेद निर्माण झाल्यानंतर २०१४ मध्ये निवडणूक आयोगाकडे विदेशी निधीच्या मुद्द्याचे प्रकरण उपस्थित केले होते. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान