दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटची चर्चा न करणे म्हणजे नो-बॉल करणेच : मोदी
By Admin | Updated: July 11, 2016 03:53 IST2016-07-11T03:53:29+5:302016-07-11T03:53:29+5:30
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटचा खेळ हा उभय देशांमध्ये संबंधाचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगताना येथे क्रिकेटबाबत न बोलणे

दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटची चर्चा न करणे म्हणजे नो-बॉल करणेच : मोदी
डरबन : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटचा खेळ हा उभय देशांमध्ये संबंधाचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगताना येथे क्रिकेटबाबत न बोलणे म्हणजे नो-बॉल केल्याप्रमाणे असल्याचे म्हटले.
येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, ‘मित्रांनो, दक्षिण आफ्रिका आणि विशेषत: डरबनमध्ये असताना जर मी क्रिकेटबाबत बोललो नाही तर ते म्हणजे नो-बॉल केल्याप्रमाणे होईल. या खेळातील उत्साह आणि खेळाप्रती असलेले प्रेम समाजात खोलवर रुजलेले आहे. क्रिकेट उभय देशांतील संबंधामध्ये महत्त्वाचा घटक आहे. किंग्समेड मैदान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या अनेक संस्मरणीय लढतींचे साक्षीदार आहे.’ पंतप्रधान मोदी सध्या चार आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर असून, त्यात द.आफ्रिकेचा समावेश आहे.