सख्ख्या नव्हे, चुलत भावाने केली कंदील बलोचची हत्या

By Admin | Updated: August 1, 2016 05:57 IST2016-08-01T05:57:09+5:302016-08-01T05:57:09+5:30

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच (२६) हिची गळा दाबून हत्या तिच्या धाकट्या भावाने नव्हे, तर चुलत भावाने केली, असे पॉलिग्राफ चाचणीतून शनिवारी स्पष्ट झाले.

Not really, but the cousin killed the lantern of Ballet | सख्ख्या नव्हे, चुलत भावाने केली कंदील बलोचची हत्या

सख्ख्या नव्हे, चुलत भावाने केली कंदील बलोचची हत्या


इस्लामाबाद : पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच (२६) हिची गळा दाबून हत्या तिच्या धाकट्या भावाने नव्हे, तर चुलत भावाने केली, असे पॉलिग्राफ चाचणीतून शनिवारी स्पष्ट झाले.
कंदीलने फेसबुकवर टाकलेल्या पोस्ट व असभ्य व्हिडीओमुळे कुटुंबाची बदनामी केली म्हणून तिचा धाकटा भाऊ व मुख्य आरोपी मोहम्मद वसीम याने गळा दाबून तिची हत्या केली, असे आधी सांगितले जात होते. वसीम यानेही तसे आधी कबूल केले होते.
वसीम व कंदीलचा चुलत भाऊ हक नवाज या दोघांची पॉलिग्राफ चाचणी केल्यावर ही बाब स्पष्ट झाली. चाचणीनुसार वसीमने नव्हे, तर हक नवाजने १५ जुलै रोजी कंदीलचा गळा दाबला. (वृत्तसंस्था)

Web Title: Not really, but the cousin killed the lantern of Ballet