स्कॉटलंडची स्वातंत्र्याला ना

By Admin | Updated: September 20, 2014 03:02 IST2014-09-20T03:02:57+5:302014-09-20T03:02:57+5:30

ऐतिहासिक सार्वमतात स्कॉटिश मतदारांनी शुक्रवारी स्वातंत्र्याला नकार देत इंग्लंड व वेल्ससोबतचे 307 वर्षे जुने नाते अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला.

Not the freedom of Scotland | स्कॉटलंडची स्वातंत्र्याला ना

स्कॉटलंडची स्वातंत्र्याला ना

सार्वमत : युनायटेड किंगडमची फाळणी टळली; विकेंद्रीकरणाच्या क्रांतीचा मार्ग प्रशस्त
लंडन/एडिनबर्ग : ऐतिहासिक सार्वमतात स्कॉटिश मतदारांनी शुक्रवारी स्वातंत्र्याला नकार देत इंग्लंड व वेल्ससोबतचे 307 वर्षे जुने नाते अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला. सार्वमताने एकीकडे स्कॉटिश जनतेमध्ये मोठी दुफळी निर्माण करतानाच दुसरीकडे विकेंद्रीकरणाच्या क्रांतीचा मार्गही प्रशस्त केला. 
55 टक्के मतदारांनी युनायटेड किंगडमसोबत राहण्याच्या बाजूने कौल देत स्वातंत्र्य समर्थकांचा धुव्वा उडवला. सर्व 32 कौन्सिलमध्ये स्वातंत्र्याला ना म्हणणा:यांचा हो म्हणणा:यांवर विजय झाला. ‘नो’च्या (स्वातंत्र्य नको) बाजूने 2क्,क्1,926 मते पडली, तर स्वातंत्र्य हवे म्हणणा:या ‘येस’च्या बाजूने 16,17,989 मतदारांनी कौल दिला. ‘बेटर टुगेदर’च्या अर्थात ऐक्याच्या बाजूने 55.3 टक्के, तर स्वतंत्र होण्याच्या बाजूने 44.7 टक्के मते पडली. अखेरच्या मतदानोत्तर चाचण्यांतील निष्कर्षाहून कितीतरी अधिक मते ऐक्याच्या बाजूने पडली. सार्वमताच्या काही आठवडे आधी स्वातंत्र्यसमर्थक आणि विरोधकांनी आपापल्या भूमिकांचा जोरदार प्रचार केल्यामुळे लढाई अटीतटीची बनली होती. स्कॉटलंडने 3क्7 वर्षे जुनी सोबत तोडण्याविरुद्ध 1क्.6 टक्क्यांच्या फरकाने कौल दिल्यानंतर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी निकालाची घोषणा केली. 
स्कॉटलंडचे फस्र्ट मिनिस्टर अलेक्स सालमोंड यांनी ऐक्याचे आवाहन करत ऐक्यवादी पक्षांकडे अधिक अधिकारांची मागणी केली. मी जनतेच्या या निकालाचा स्वीकार करतो, तसेच स्कॉटलंडमधील सर्व नागरिकांना लोकशाही पद्धतीने झालेल्या निर्णयाचे स्वागत 
करण्याचे आवाहन करतो, असे ते म्हणाले. 
सालमोंड स्कॉटिश नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेते असून त्यांनी स्वातंत्र्याच्या बाजूने जोरदार प्रचार केला होता. आपण किती कमी पडलो याचा विचार करू नका, तर आपण किती अंतर पार केले याचा विचार करा, असेही आवाहन त्यांनी स्कॉटिश जनतेला केले. स्वातंत्र्याच्या अनेक समर्थकांनी या निकालामुळे तीव्र दु:ख झाल्याचे म्हटले आहे.  (वृत्तसंस्था)
 
पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून आनंदी; सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे दिले वचन
4युनायटेड किंगडममध्येच राहण्याच्या स्कॉटिश नागरिकांच्या निर्णयाचे स्वागत करताना कॅमेरून यांनी वेस्टमिनिस्टर येथे इंग्लिश मुद्यांवर इंग्लिश संसद सदस्यांच्या मतदानासह संपूर्ण ग्रेट ब्रिटनमध्ये विकेंद्रीकरणाच्या क्रांतीचे वचन दिले. 
 
4आमच्या युनायटेड किंगडमचा शेवट झाल्याचे पाहताना माङो हृदय फाटेल, असे मी प्रचारादरम्यान म्हटले होते. त्यामुळे स्कॉटिश जनतेने सोबत न तोडण्याचा निर्णय घेण्याचा इतर लाखो लोकांप्रमाणोच मलाही आनंद झाला आहे, असे कॅमेरून म्हणाले. 
 
4ते लंडनमधील 1क् डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाबाहेर बोलत होते. स्कॉटलंडला आपल्या व्यवहाराबाबत जसे अधिक अधिकार मिळतील, तसेच ते इंग्लंड, वेल्स आणि नार्दर्न आर्यलडलाही मिळतील, असे ते म्हणाले.  
 
आसू अन् हसू.. स्कॉटलंडमधील सार्वमताचा निकाल ब्रिटनसोबतचे नाते न तोडण्याच्या बाजूने गेल्यानंतर ऐक्यवादी नागरिकांनी ग्लासगो शहरात शुक्रवारी जल्लोष केला, तर दुस:या छायाचित्रत निकाल विरोधात गेल्यामुळे खिन्न झालेले स्वातंत्र्यवादी जोडपे दिसत आहे.

 

Web Title: Not the freedom of Scotland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.