नॉर्वेत हेलिकॉप्टर कोसळून १३ ठार
By Admin | Updated: April 29, 2016 20:35 IST2016-04-29T20:29:37+5:302016-04-29T20:35:07+5:30
नॉर्वेच्या पश्चिम किना-याजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले आहेत.

नॉर्वेत हेलिकॉप्टर कोसळून १३ ठार
ऑनलाइन लोकमत
नॉर्वे, दि.२९ - नॉर्वेच्या पश्चिम किना-याजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले आहेत.
येथील स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नार्वेतील बर्गन शहराजवळ असलेल्या किना-याजवळ शुक्रवारी हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमधून १३ जण प्रवास करत होते, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता झाले, असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर, ज्यावेळी या हेलिकॉप्टरचा अपघात घडला, त्यावेळी मोठा स्फोट झाल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीनीं सांगितले. दरम्यान, घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे.