शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
2
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
3
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
4
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
5
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
6
"मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा"; आशिष शेलारांची मागणी
7
निर्मात्याचा सनी देओलवर फसवणूकीचा आरोप; म्हणाला, 'करोडो रुपये थकवले अन् आता...'
8
उष्णतेचा कहर पण पोलिसाच्या कार्याला सलाम; बेशुद्ध झालेल्या माकडाचा वाचवला जीव
9
"तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार फक्त..."; हिंजवडीमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याने संतापला ठाकरे गट
10
पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?
11
खरेच स्वाती मालिवाल अन् ध्रुव राठी यांच्यात फोनवरून संभाषण झाले? पाहा, व्हायरल ऑडिचे सत्य
12
कोण आहे 'ही' महिला? जिच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नतमस्तक, 'मन की बात'मध्येही उल्लेख! 
13
घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून 'डिओ'चा फवारा मारता का?; थांबा... काही सोपे उपाय करून बघा
14
Gold-Silver Rate Today : मोठ्या तेजीनंतर सोन्या-चादीच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट
15
Top 10 Employers In India : संरक्षण मंत्रालय, रेल्वे, टीसीएस कोणत्या कंपन्या देताहेत सर्वाधिक नोकऱ्या; जाणून घ्या
16
"अयोध्येत राम जन्मभूमीसाठी पहिली लढाई शिखांनीच लढवली", शेवटच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
'बिग बॉस मराठी'मधून महेश मांजरेकर या कारणामुळे पडले बाहेर, म्हणाले - "शोसाठी..."
18
NDA ला विजय मिळाला तर 9 जूनला कुठे होणार 'सेलिब्रेशन', शपथविधी? संपूर्ण प्लॅन तयार, हजारो लोक होणार सहभागी
19
T20 World Cup 2024 : India vs Pakistan सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट; ISIS ची धमकी
20
"परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

कोरोना लस घेतल्यानंतर तरूणीच्या स्तनाचा आकार वाढला; डॉक्टर म्हणाले 'चिंता नको!'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 3:55 PM

Coronavirus Vaccine Side Effects : नॉर्वेमध्ये एका 17 वर्षाच्या एम्मा नावच्या तरूणीने कोरोना लस घेतल्यानंतर तिला दुष्परिणाम जाणवले. 

ऑस्लो : कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनावरील ही लस घेतल्यानंतर जगभरातील अनेक लोकांमध्ये याचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट) होत असल्याचेही समोर येत आहे. अशीच एक काहीशी वेगळी घटना समोर आली आहे. नॉर्वेमध्ये एका 17 वर्षाच्या एम्मा नावच्या तरूणीने कोरोना लस घेतल्यानंतर तिला दुष्परिणाम जाणवले. 

एम्माने कोरोनावरील फायझरची लस घेतल्याच्या काही दिवसानंतर तिच्या स्तनांचा आकार मोठा झाला. त्यामुळे भयभीत झालेल्या एम्माने  डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी तिला चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.नार्वेमधील स्थानिक माध्यम एनआरकेने दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारचे साइड इफेक्ट झालेली एम्मा ही एकटीच महिला नाही. ही समस्या इतरही काही महिलांना जाणवली. एम्माने म्हटले की, 'माझ्यासारखा त्रास आणखी काही महिलांना झाल्याचे मी पाहिले आहे. त्यावेळी मी ऑनलाइन सर्च करून माहिती घेतली. अमेरिकेत याबाबत काही लेख प्रकाशित झाला आहे.'

लिम्फ नोडमुळे साइड इफेक्ट?हे साइड इफेक्ट सूजलेल्या लिम्फ नोडसंबंधीत असू शकतात. लस घेतल्यानंतर जाणावणारे असामान्य लक्षणे नाहीत, असे एका तज्ज्ञांने सांगितले. तर नार्डलँड रुग्णालयातील डॉक्टर हेइनरिच बॅकमॅन यांनी सांगितले की, काही लस घेतलेल्या महिलांना ज्या बाजूने सिरिंज लावण्यात आली. त्या बाजूकडील लिम्फ नोडचा आकार मोठा होत असल्याचे आढळून आले. हा वाढलेला आकार दिसून येतो. यामुळे महिलांनी घाबरून जाऊ नये असेही हेइनरिच बॅकमॅन यांनी म्हटले आहे.

नार्डलँड रुग्णालयाने महिलांना चार आठवड्यांची प्रतिक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. नॉर्वेच्या आरोग्य विभागाशी संबंधित असलेले स्टेइनार मॅडसेन यांनी सांगितले की, त्यांच्या विभागाला स्तनाचा आकार वाढल्याबाबत तक्रार मिळाली नाही. मात्र, असे असल्यास सूजलेल्या लिम्फ नोड्समुळे स्तनांचा आकार वाढला असू शकतो. तसेच, लस घेतलेल्यांपैकी 10 टक्के जणांच्या लिम्फ नोडमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे स्तनाचा आकार वाढू शकतो. अशा महिलांना स्तनाचा आकार मोठा झाला असल्याचे वाटू शकते, असेही स्टेइनार मॅडसेन म्हणाले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य