उत्तर कोरियाच्या नौदलाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर कोरियामध्ये रशियन मदतीने तयार केलेली युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली. ही घटना बुधवारी चोंगजिन बंदरावर घडली, यावेळी किम जोंग उन स्वतः उपस्थित होते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या हुकूमशहा किम जोंग उन यांनी शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
उत्तर कोरियाच्या राज्य एजन्सी केसीएनएनुसार, रॅम्पवरून खाली उतरताना युद्धनौकेचा तोल गेला. फ्लॅटकॅप वेळेत हलला नाही, यामुळे जहाज झुकले आणि ते कोसळले.
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
किम जोंग उन भडकले
किम जोंग उन यांनी या अपघाताचे वर्णन "गंभीर अपघात आणि गुन्हेगारी निष्काळजीपणा" असे केले. त्यांनी शास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि शिपयार्ड कामगारांवर "पूर्णपणे बेजबाबदार आणि अवैज्ञानिक वृत्तीचा" आरोप केला. या चुकीबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांनी वर्कर्स पार्टीची आपत्कालीन बैठक बोलावण्याचे आदेशही दिले.
हे जहाज उत्तर कोरियाच्या आधुनिक विध्वंसकांच्या श्रेणीचा एक भाग होते, याचे अनावरण २५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. ते अणु क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होणार होते. किम जोंग उनने त्यांच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचेही निरीक्षण केले आणि पुढील वर्षापासून त्याचा नौदलात समावेश होणार होता.
रशियन मदतीने जहाज तयार केले होते
हे जहाज रशियाच्या तांत्रिक मदतीने बांधले होते. उत्तर कोरियाचे नौदल दक्षिण कोरियाच्या तुलनेत कमकुवत मानले जात असले तरी, हे नवीन जहाज त्यांची लष्करी ताकद आणि प्रहार क्षमता लक्षणीयरीत्या वाढवू शकते.
उत्तर कोरिया आपले अणु आणि क्षेपणास्त्र चाचण्या वेगाने घेत आहे. दरम्यान, आता जहाजाचा हा मोठा अपघात झाला. किम यांनी आपल्या नौदलात अणुशक्ती असलेल्या पाणबुड्यांचा समावेश करण्याचे नियोजन केले आहे. अमेरिका आणि त्यांच्या आशियाई मित्र राष्ट्रांकडून होणाऱ्या लष्करी सरावांना आपल्या सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.