शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

....आदेश मिळाल्यास अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 13:25 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या धमकीनंतर जनतेनं हे विरोध प्रदर्शन केलं आहे.

प्योंगयांग, दि. 10 - अमेरिका आणि उत्तर कोरियामधील वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला उद्ध्वस्त करण्याच्या दिलेल्या धमकीनंतर तिथल्या लोकांनी अमेरिकेविरोधात विरोध प्रदर्शन केलं आहे. तसेच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांना जाहीर समर्थन दिलं आहे. जर आमच्या हुकूमशाहानं आदेश दिला, तर अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकू, असं उत्तर कोरियाच्या जनतेनं म्हटलं आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या धमकीनंतर जनतेनं हे विरोध प्रदर्शन केलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प पहिल्यापासूनच उत्तर कोरियाला धमकी देत आले आहेत. मात्र यावेळी त्यांनी दिलेली ही शेवटची धमकी समजली जातेय. ट्रम्प म्हणाले होते, उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं, तर जगात कुठल्याही देशाचा झाला नाही, उत्तर कोरियाचा असा विध्वंस करू. ट्रम्प यांच्या या विधानानंतर उत्तर कोरियाच्या जनतेनं अमेरिकेच्या विरोधात प्रदर्शन केलं आहे. अमेरिका प्रशांत महासागरातील गुआमवर मिसाइल हल्ला करण्याच्या विचारात आहे. त्यालाही उत्तर कोरियाच्या जनतेनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उत्तर कोरियाच्या सरकारनंच या रॅलीचं आयोजन केलं आहे. रॅलीमध्ये उत्तर कोरियाच्या जनतेनं अमेरिकेच्या विरोधात स्लोगन आणि बॅनर, पोस्टर्स लावून विरोध प्रदर्शन केलं आहे. रॅलीमधील एका विद्यार्थ्यांनी अमेरिकेलाच धमकी दिली आहे. उत्तर कोरियाची स्वातंत्र्यता आणि विकासाच्या अधिकाराला काढून घेणा-या अमेरिकेला कधीही सहन करणार नाही. आमचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी आदेश दिल्यास अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून त्याला उद्ध्वस्त करू. तो विद्यार्थी म्हणाला, गुआनमधील अमेरिकेच्या लष्करावल मिसाइल टाकण्याच्या आम्ही विचारात आहोत. 

अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सातत्यानं अण्वस्त्र चाचणी करणा-या उत्तर कोरिया या देशावर गेल्या काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रानं कडक निर्बंध लादले होते. उत्तर कोरियावर कडक प्रतिबंध लादण्यासाठी अमेरिकेनं एक प्रस्ताव तयार करून संयुक्त राष्ट्रात ठेवला होता. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रानं सर्व देशांच्या संमतीनं मंजुरी दिली होती. उत्तर कोरियानं लागोपाठ घेतलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियावर कडक निर्बंध घातले आहेत. तसेच उत्तर कोरियातून होणा-या निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रानं उत्तर कोरियाच्या निर्यातीवर प्रतिबंध घातल्यामुळे प्योंगयांगला वर्षाकाठी जवळपास 1 अब्ज डॉलरला मुकावं लागणार आहे.डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाविरोधात एवढं कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रस्तावानुसार मासे व समुद्री खाद्यपदार्थ, कोळसा, लोह इत्यादींच्या निर्यातीवर निर्भर असलेल्या उत्तर कोरियाला आता निर्यात करता येणार नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे. जर सर्व देशांनी हे प्रतिबंध पाळल्यास उत्तर कोरियाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. चीनसोबत जवळपास एका महिन्याच्या चर्चेनंतर अमेरिकेनं या प्रस्तावाचा मसुदा तयार केला आहे. चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा व्यापारी सहयोगी आहे. 4 जुलै रोजी उत्तर कोरियानं केलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण घेतल्यानंतर हा प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी 28 जुलै रोजी उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्रानं 2006 पासून आतापर्यंत उत्तर कोरियावर जवळपास सात वेळा निर्बंध लादले आहेत. मात्र या प्रस्तावानंतर उत्तर कोरियाच्या भूमिकेत कोणताही फरक पडलेला दिसला नाही.