शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
5
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
6
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
7
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
8
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
9
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
10
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
11
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
12
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
13
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
14
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
15
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
16
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
17
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
18
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
19
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
20
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

त्रास सहन करण्याची तयारी ठेवा, निर्बंधांनंतर उत्तर कोरियाची अमेरिकेला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 00:20 IST

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेल्या निर्बंधांचा उत्तर कोरियावर कोणताच परिणाम झाल्याचे दिसत नसून, ते निर्बंध धुडकावून लावताना, उत्तर कोरियाने अमेरिकेलाच थेट धमकी दिली आहे.

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेल्या निर्बंधांचा उत्तर कोरियावर कोणताच परिणाम झाल्याचे दिसत नसून, ते निर्बंध धुडकावून लावताना, उत्तर कोरियाने अमेरिकेलाच थेट धमकी दिली आहे. अमेरिकेने लवकरच सर्वात मोठा त्रास सहन करण्याची तयारी ठेवावी, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यामुळे, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दोन दिवसांपूर्वी त्या देशावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय एकमताने घेतला.

तीन सप्टेंबर रोजी उत्तर कोरियाने सहावी आणि सगळ्यात मोठी अणू चाचणी केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले आहेत. आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने एकमताने कठोर निर्बंध लादणारा ठराव संमत केला. या निर्बंधांचा मसुदा अमेरिकेने केला होता. उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमापासून रोखण्यासाठी त्याच्या तेलाच्या आयातीला आणि कापडाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या निर्बंधांचा समावेश आहे.

अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाला जग कधीही स्वीकारणार नाही, असे आज आम्ही म्हणत आहोत. आणि आज सुरक्षा परिषद म्हणत आहे की जर उत्तर कोरियाने आपला अणू कार्यक्रम थांबवला नाही तर तो थांबवण्याचे काम आम्ही स्वत: करू, असे संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यावेळी म्हणाल्या.

उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांच्या 15 सदस्यांच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी निर्बंध लादणारा ठराव एकमताने संमत केला होता. उत्तर कोरियाने योग्य त्या गोष्टी कराव्यात यासाठी आम्ही प्रयत्न केले. चुकीच्या गोष्टी पुढेही सुरू ठेवण्याची त्याची क्षमता रोखण्यासाठी आम्ही आता कृती करीत आहोत, असे हॅले म्हणाल्या. उत्तर कोरियाला त्याच्या अणु कार्यक्रमासाठी मिळणा-या पैशांच्या क्षमतेवर घाव घालण्याचे काम संयुक्त राष्ट्रे करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

उत्तर कोरियाकडून होत असलेल्या संपूर्ण तेल आयातीवर बंदीसह अमेरिकेने मूळात कठोर निर्बंधांचा प्रस्ताव मांडला होता. परंतु निर्बंधांत कपात केल्यानंतरच उत्तर कोरियाचे मित्र देश रशिया आणि चीनच्या संमतीनंतर ठराव संमत झाला. हॅले म्हणाल्या की, उत्तर कोरियाचे अण्वस्त्रांच्या उभारणीचे प्रयत्न आणि त्याच्या चाचण्यांचा मुख्य आधार हा तेल आहे. वायू, डिझेल आणि जड इंधन तेलामध्ये 55 टक्के कपात केल्यामुळे उत्तर कोरियाला मिळणा-या तेलात ठरावाने 30 टक्के कपात केली आहे. या निर्बंधांमुळे उत्तर कोरियाच्या वार्षिक महसूलात 500 दशलक्ष किंवा त्यापेक्षाही जास्त अमेरिकन डॉलरची कपात होणार आहे.

आम्ही कुठेही आणि कधीही न्यूक्लियर टेस्ट करू- उत्तर कोरिया

आम्ही कुठेही आणि कधीची न्यूक्लियर टेस्ट करू शकतो, अशी धमकीच उत्तर कोरियानं अमेरिकेला दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनं स्वतःची यूएसएस कार्ल विल्सन ही युद्धनौका कोरियन द्विपकल्पात तैनात केली आहे. त्यामुळे कोरियन द्विपकल्पात तणाव वाढला आहे. तसेच कोणत्याही दबावाला न घाबरता उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनीही अमेरिकेला युद्धासाठी तयार असल्याची धमकी दिली आहे. आम्ही कोणत्याही हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. आम्ही कधीही आणि कुठेही अण्वस्त्र चाचणी करण्यासाठी सक्षम आहोत. मात्र याचा निर्णय देशाच्या सर्वोच्च नेत्याला घ्यावा लागणार आहे, असं वक्तव्य उत्तर कोरियाच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी केलं आहे. 

आमच्या तीन बॉम्बनी जगाचा होईल विनाश- उत्तर कोरिया

आमच्याकडे असंख्य अणुबॉम्ब असून, त्यातल्या केवळ तीन अणुबॉम्बनी संपूर्ण जगाचा नायनाट होऊ शकतो," अशी धमकी उत्तर कोरियाच्या पश्चिमी देशातील राजदूत आलेहांद्रो बेनोस यांनी दिली आहे. ते म्हणाले, उत्तर कोरियाला कोणीही हात लावू शकत नाही. जर असं झाले तर लोक बंदुका आणि मिसाइलनं देशाची सुरक्षा करतील. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब आहेत. त्यातील तीन अणुबॉम्ब हे पूर्ण जगाला नेस्तनाबूत करण्यासाठी पुरेसे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील इसिसच्या तळांवर अमेरिकेनं "मदर ऑफ ऑल बॉम्ब" टाकला होता. इसिसला दिलेल्या दणक्यानंतर अनेक देशांकडून उत्तर कोरियाला धमक्या येत आहेत. एका स्पॅनिश न्यूज साइटशी बोलताना बेनोस यांनी उत्तर कोरियाच्या युद्धविषयक अभ्यासाचीही माहिती दिली आहे.