शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रशियाच्या मदतीसाठी उत्तर कोरिया सरसावला; किम जोंग यांनी पाठवले आपले 12000 सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:30 IST

युक्रेनविरोधातील युद्धासाठी उत्तर कोरियाने रशियाला आपले सैन्य पाठवले आहे.

Russia-Ukraine : रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत कोणत्याही देशाला निर्णायक आघाडी घेता आलेली नाही. एकीकडे पाश्चिमात्य देश युक्रेनला सातत्याने शस्त्रे पुरवत आहेत, तर दुसरीकडे रशियालाही आता या युद्धात मोठी मदत मिळाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी हजारो सैनिक पाठवल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग यांची भेट झाली होती.

किती सैनिक पाठवले?युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने 12,000 सैनिक पाठवले आहेत, असे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या योनहाप न्यूज एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्थेने नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिस (NIS) च्या इनपुटचा हवाला देत सांगितले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी रशियात दाखल झाले आहे. 

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक उत्तर कोरियाने रशियाला मदत करण्यासाठी सैन्य पाठवल्याच्या मुद्द्यावर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीची बैठक घेतली आहे. राष्ट्रपती युन सुक येओल यांच्या कार्यालयाने म्हटले की, राष्ट्रपतींनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. उत्तर कोरियाने रशियाला सैन्य पाठवण्याचे वृत्त सरकारने खरे मानले आहे की नाही, याची अद्याप सरकारने पुष्टी केलेली नाही.

ऑस्ट्रेलिया युक्रेनला रणगाडे देणारदुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने युक्रेनला त्यांचे अब्राम रणगाडे देण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी सांगितले की, युक्रेनने काही महिन्यांपूर्वी हे रणगाडे देण्याची विनंती केली होती. ऑस्ट्रेलियन सरकार युक्रेनला त्यांचे अमेरिकन बनावटीच्या M1A1 रणगाडे देत आहे, ज्यांची किंमत 245 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाKim Jong Unकिम जोंग उनwarयुद्ध