शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उत्तर कोरियानं पुन्हा केली क्षेपणास्त्रची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 8:01 AM

उत्तर कोरियानं मंगळवारी पुन्हा क्षेपणास्त्रची चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावेळी जपानवरुन हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याने परिसरात तणाव वाढला आहे.

प्योंगयांग, दि. 29 -  उत्तर कोरियानं मंगळवारी पुन्हा क्षेपणास्त्रची चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावेळी जपानवरुन हे क्षेपणास्त्र सोडण्यात आल्याने परिसरात तणाव वाढला आहे.  या क्षेपणास्त्रानं 2700 किलोमीटरचे अंतर पार केले व ते जपानच्या उत्तरेकडील प्रशांत महासागरामध्ये जाऊन पडले. यावर तज्ज्ञांचं असे म्हणणे आहे की, युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास त्यादरम्यान आम्ही माघार घेणार नाही, असा संदेश उत्तर कोरियानं आपल्या आक्रमक पवित्र्यानं अमेरिका आणि त्याच्या जवळील देशांना देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी अमेरिकेला उत्तर कोरियावर दबाव वाढवण्याची मागणी केली आहे. शिवाय, जपानमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणालेत. 

सोलचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफनं सांगितले की, उत्तर कोरियाकडून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानं 2,700 किलोमीटरपर्यंतचे अंतर पार केले आणि 550 किलोमीटरहून अधिक उंचीपर्यंत पोहोचले होते. हे क्षेपणास्त्र जपानच्या होकाइदो आयलँडवरुन डागण्यात आले. 2009 नंतर पहिल्यांदा उत्तर कोरियाकडून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानं जपानचा परिसर पार केला आहे, असे म्हटले जात आहे.   उत्तर कोरियाकडून करण्यात येणा-या क्षेपणास्त्रांच्या चाचणीदरम्यान परिसरातील तणाव वाढत आहे. शिवाय हा देश अमेरिकेला टार्गेट करण्यासाठी आपले ध्येय साध्य करण्याच्या जवळ जातानाही पाहायला मिळत आहे. 

उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणस्त्रांची चाचणी केली जात असते. यावर काही तज्ज्ञांचं असे म्हणणे आहे की, उत्तर कोरिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अशा काही शस्त्राची निर्मिती करेल, ज्याद्वारे हा देश अमेरिकेला निशाणा बनवू शकतो.  तर दुसरीकडे दक्षिण कोरियानं असे म्हटले आहे की, आम्ही अमेरिकेसोबत या परिस्थितीचे विश्लेषण करत आहेत. जेणेकरुन आगामी काळात उत्तर कोरियाकडून होण्या-या कुठल्याही हालचालीपूर्वीच तयारी पूर्ण होऊ शकेल. 

सर्व पर्याय खुले - ट्रम्पवॉशिंग्टन : उत्तर कोरियाने जपानवरून क्षेपणास्त्र डागल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी परखड शब्दात सर्व पर्याय हाताशी असल्याचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने केलेल्या दु:साहसातून काहीतरी गंभीर घडण्याचे संकेत मिळतात, असे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत निक्की हॅले यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनिओ गुटेरस यांनीही उत्तर कोरियाच्या या आगळिकीचा तीव्र धिक्कार केला आहे. अमेरिका आणि जपानच्या विनंतीनसुार सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलाविली आहे.दडपण आणा... जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर ४० मिनिटे चर्चा केली. आम्ही कोरियावर दडपण वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी तातडीने बैठक बोलवावी, असे अबेम्हणाले. रशियाकडून चिंता...उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल रशियाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तेथील घडामोडींमुळे आम्हाला काळजी वाटते. 

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्योंगयांगनं अमेरिकेतील गुआमवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. गुआम बेटावर अमेरिकेचे 7 हजार सैनिक तैनात आहेत. भविष्यात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागलीच तर फक्त 14 मिनिटांत ही क्षेपणास्त्रे गुआममध्ये विध्वंस घडवतील. या क्षेपणास्त्रांना अमेरिकन भूमीपर्यंत पोहोचायला फक्त 14 मिनिटे लागतील, असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले होते.  युद्धाचा प्रसंग उदभवल्यास फक्त 15 मिनिटात अलर्ट वॉर्निंग सिस्टिम, सायरनच्या मदतीने लगेच नागरीकांना सर्तक केले जाईल, असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले होते. उत्तर कोरियाने अमेरिका किंवा आमच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला केला तर, उत्तरकोरियाने कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतील, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिला आहे. 

दरम्यान, आता चाचणी करण्यात आलेल्या क्षेपणस्त्राबाबत सोलनं सांगितले की, जपानवरुन सोडण्यात आलेले हे क्षेपणास्त्र सुनानहून लाँच करण्यात आले.  यावर जपानमधील अधिका-यांनी असे सांगितले की, उत्तर कोरियाकडून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. जपानच्या 'एनएचके टीव्ही'नं दिलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्र डागण्यात आल्यानंतर ते तीन भागांमध्ये विभागले गेले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी उत्तर कोरियानं तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचंही परिक्षण केले होते. 

 

टॅग्स :border disputeसीमा वाद