शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

अमेरिकेच्या धमकीला किम जोंग उनचा ठेंगा; एकापाठोपाठ एक डागली ८ क्षेपणास्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 17:24 IST

अमेरिकेची विमानवाहू नौका रोनाल्ड रीगनने फिलीपीन समुद्रात दक्षिण कोरियासोबत तीन दिवसीय नौदल सराव पूर्ण केल्यानंतर एक दिवसाने ही चाचणी घेण्यात आली.

उत्तर कोरियाने रविवारी समुद्राच्या दिशेने आठ कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली. दक्षिण कोरियाची राजधानी प्योंगयांगजवळील सुनन भागातून ३५ मिनिटांपेक्षा जास्त काळ एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्रे डागण्यात आली अशी माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली. 

दक्षिण कोरियाच्या लष्कराने क्षेपणास्त्रे किती अंतरावर पडली हे सांगितले नाही, परंतु उत्तर कोरियाकडून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याने दक्षिण कोरियाच्या लष्कराने पाळत वाढवली आहे. अमेरिकेची विमानवाहू नौका रोनाल्ड रीगनने फिलीपीन समुद्रात दक्षिण कोरियासोबत तीन दिवसीय नौदल सराव पूर्ण केल्यानंतर एक दिवसाने ही चाचणी घेण्यात आली.

NSA सुरक्षेसंदर्भात बैठक घेणार दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांच्या कार्यालयाने सांगितले की, त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) किम सुंग-हान चाचणीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलवतील. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी चाचणीबद्दल माहिती गोळा करण्यासाठी विमान आणि जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मात्र, नुकसानीचे तात्काळ वृत्त नाही.

'अमेरिकन सैनिकांना धोका नाही'अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने म्हटले आहे की, त्यांना उत्तर कोरियाच्या अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्यांबद्दल माहिती आहे, परंतु यामुळे यूएस कर्मचार्‍यांना, प्रदेशाला किंवा आमच्या मित्र राष्ट्रांना तात्काळ धोका निर्माण झाला नाही.

अणुचाचणी केंद्र उभारण्याची तयारी सुरूउत्तर कोरियाने २०२२ मध्ये केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या क्रमवारीतील ही १८वी चाचणी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या या कट्टरतेचा उद्देश अमेरिकेला आर्थिक आणि सुरक्षा सवलतींसाठी वाटाघाटी करण्यास भाग पाडणे आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर कोरिया पुंग्ये-री या ईशान्येकडील शहरामध्ये आण्विक चाचणी केंद्रात अधिक तयारी करत असल्याची चिन्हे आहेत.

अमेरिकेचा इशाराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचे उत्तर कोरियातील विशेष दूत सुंग किम यांनी शुक्रवारी सांगितले की, वॉशिंग्टन आपल्या आशियाई मित्र राष्ट्रांशी जवळून समन्वय साधून सर्व आपत्कालीन परिस्थितींसाठी तयारी करत आहे. उत्तर कोरियाने नवीन अण्वस्त्र चाचण्या घेतल्यास अमेरिकेने अतिरिक्त आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्याचा आग्रह धरला आहे, परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या हालचालीची शक्यता कमीच दिसत आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाAmericaअमेरिका