शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:18 IST

उत्तर कोरियाने केवळ इस्रायलवरच टीका केली नाही तर, अमेरिका आणि युरोपीय देशांवरही गंभीर आरोप केले आहेत.

इराण-इस्रायल संघर्ष शिगेला पोहोचला असून मध्यपूर्वेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. प्योंगयांगच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी इराणच्या नागरी, अणु आणि ऊर्जा तळांवर केलेल्या हल्ल्यांसंदर्भात एक निवेदन जारी करत, "हा मानवतेविरुद्धचा अक्षम्य गुन्हा असून प्रदेशाला एक नव्या व्यापक युद्धाकडे ढकलत असल्याचे म्हटले आहे.

उत्तर कोरीयाचे अमेरिका आणि युरोपीय देशांवरही गंभीर आरोप -उत्तर कोरियाने केवळ इस्रायलवरच टीका केली नाही तर, अमेरिका आणि युरोपीय देशांवरही गंभीर आरोप केले आहेत. अमेरिका आणि युरोपीय देश देखील या गुन्ह्यात संयुक्त भागीदार आहेत आणि राज्य-पुरस्कृत दहशतवादाला संरक्षण देत आहेत, असे उत्तर कोरीयाने म्हटले आहे. 

मध्य पूर्वेच्या शांततेसाठी कर्करोग... -एवढेच नाही तर, अमेरिका आणि पाश्चात्य देश, इस्रायलच्या सोबतीने मध्य पूर्वेच्या शांततेसाठी कर्करोग बनत आहेत. तथापि, आंतरराष्ट्रीय समुदाय, पीडित इराणचे सार्वभौमत्व आणि स्वसंरक्षणाचा अधिकार सातत्याने नाकारण्याचा प्रयत्न करत असलेल्या अमेरिका आणि पश्चिमेकडे लक्ष ठेवून आहे," असे उत्तर कोरीयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांचं विधान अन् उत्तर कोरियाचा इशारा -अमेरिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की, इराणसंदर्भात आपले धैर्य आता संपले आहे. त्यांनी ही स्थिती आणखी संवेदनशील बनवली आहे. याला उत्तर देत उत्तरकोरीयाने म्हटले आहे, आपली कारवाई मध्य पूर्वेला विनाशाकडे घेऊन जात आहे. उत्र कोरीयाच्या या विधानावरून इराण आणि उत्तर कोरीया दोघेही असंतुष्ट असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणnorth koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू