शहरं
Join us  
Trending Stories
1
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
2
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
3
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
4
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
5
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
6
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
7
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
8
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
9
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
10
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
11
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
12
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
13
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
14
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
15
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
16
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
17
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
18
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
19
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
20
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईवरून जग चिंतेत असताना उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने मिसाईल डागली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:09 IST

North Korea Missile Test: उत्तर कोरियाने रविवारी पहाटे संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने पूर्व आशियात तणाव वाढला आहे. जपान आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश. वाचा सविस्तर.

टोकियो/सोल: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करत त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतलेले असताना दुसरीकडे उत्तर कोरियाने खळबळ उडवून दिली आहे. रविवारी पहाटे उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून जपानच्या समुद्रात संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या अनपेक्षित चाचणीमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा देण्यात आला असून दोन्ही देशांचे लष्कर हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने डागलेली ही क्षेपणास्त्रे जपानच्या 'एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन'च्या (EEZ) बाहेर समुद्रात पडली. मात्र, या प्रक्षेपणामुळे जपान सरकारने काही काळासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले होते. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत म्हटले की, "उत्तर कोरियाच्या या कारवायांमुळे प्रादेशिक शांतता आणि जागतिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे."

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या चीन दौऱ्यापूर्वीच चाचणी विशेष म्हणजे, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग हे आज चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत कोरियन द्विपकल्पातील शांततेवर चर्चा होणार होती. या दौऱ्याच्या अवघ्या काही तास आधीच किम जोंग उन यांच्या प्रशासनाने ही चाचणी करून दक्षिण कोरिया आणि मित्रराष्ट्रांना कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रम्प यांच्या व्हेनेझुएलातील कारवाईशी संबंध? काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी व्हेनेझुएलामध्ये केलेल्या लष्करी कारवाईनंतर उत्तर कोरियाने हे पाऊल उचलले आहे. कोणत्याही परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तर कोरिया सज्ज आहे, हे दाखवण्यासाठी किम जोंग उन यांनी ही 'शक्तीप्रदर्शनाची' वेळ निवडल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : North Korea fires missile towards Japan amid Venezuela crisis fears.

Web Summary : Amid Venezuela tensions, North Korea launched a ballistic missile toward Japan, triggering alerts. This test occurred before South Korea's president's China visit, potentially signaling defiance after the US action in Venezuela.
टॅग्स :north koreaउत्तर कोरियाKim Jong Unकिम जोंग उनJapanजपानAmericaअमेरिका