शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 07:17 IST

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) करणा-या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. 9 वर्षांपूर्वीसुद्धा उत्तर कोरियाचं नाव या यादीत टाकण्यात आलं होतं. त्यानंतर जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देश असल्याचं जाहीर केलं आहे. खरंतर हे आधीच करायला हवं होतं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कॅबिनेट बैठकीत म्हणाले, उत्तर कोरियावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लादण्यात येतील. ट्रम्प यांनी आण्विक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांच्या कारवाईचं समर्थन केल्याप्रकरणी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत टाकलं आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी संयुक्त राष्ट्रानं घातलेलं निर्बंध झुगारून स्वतःचा आण्विक कार्यक्रम आणि अणुचाचणी सुरूच ठेवली आहे.या वर्षी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर निर्बंध लादले होते. उत्तर कोरियाचा निर्बंधाचा प्रस्ताव अमेरिकेनं तयार केला होता आणि त्या प्रस्तावाला चीन व रशियासह 15 सदस्य देशांनी मंजुरी दिली होती. या निर्बंधांच्या माध्यमातून अमेरिकेनं उत्तर कोरियाची नाकेबंदी करायचा प्रयत्न केला. उत्तर कोरियातून कपड्यांची निर्यात, कच्च्या तेलाची आयात बंद करून परदेशात असलेली किम जोंग ऊन यांची संपत्ती गोठवली होती. परंतु तरीही उत्तर कोरियानं आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार दहशतवादाचं समर्थन करणा-या देशांना या यादीत टाकण्यात येतं. इराण, सुडान, सीरिया या देशांची नावंसुद्धा दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत आहेत. 2008मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी उत्तर कोरियाचं नाव या यादीतून हटवलं होतं. त्यावेळी उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम थांबवण्यावरही चर्चा सुरू होती. अमेरिकेच्या दबावाला न झुगारून उत्तर कोरियांनी स्वतःचा आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. त्यामुळे कोरियन द्विपकल्पातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर कोरिया आणखी एका क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत आहे,असे वृत्त दक्षिण कोरियाच्या गुप्तचर खात्याने दिले होते.उत्तर कोरियाने तीन सप्टेंबरला शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. उत्तर कोरियाकडून सातत्याने अमेरिकेला युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यामुळे अमेरिकेनेही उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी अशा प्रकारचा युद्ध सराव सुरु केला आहे. 

सप्टेंबर महिन्यातही अमेरिकेच्या फायटर विमानांनी दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांसोबत सराव केला. यावेळी अमेरिकेची चार F-35B स्टेलथ फायटर जेट आणि दोन B-1B बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती. उत्तर कोरियानवे बेजबाबदारपणे जी शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालवली आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा वारंवार अमेरिकेकडून इशारा देण्यात येत आहे. तरीही उत्तर कोरियाच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही. उत्तर कोरियावर जरब बसवण्यासाठी अशा प्रकारचा सराव सुरु आहे. उत्तर कोरियाने सहाव्यांदा अणूचाचणी केली तसेच जपानच्या दिशेने दोनदा क्षेपणास्त्र डागले त्यानंतर कोरियन द्विपकल्पातील तणावात अधिकच भर पडली. 

उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पnorth koreaउत्तर कोरिया