शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:10 IST

Nobel Peace Prize demand by Pakistan: अमेरिका-इराण शस्त्रसंधीत मध्यस्थी केल्याचा दावा करत पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल असीम मुनीर यांना नोबेल शांती पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या मर्यादित शस्त्रसंधीनंतर आता शेजारील देश पाकिस्तानमध्ये विचित्र मागण्यांना उधाण आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना 'नोबेल शांती पुरस्कार' देण्यात यावा, असा सूर पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील चर्चेत उमटू लागला आहे.

नुकताच अमेरिका आणि इराण दरम्यान शस्त्रसंधीचा निर्णय जाहीर झाला. या घडामोडीत पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचा दावा तिथल्या माध्यमांकडून केला जात आहे. पाकिस्तानी टीव्हीवरील एका पॅनेल चर्चेदरम्यान  असा दावा केला की, "जगात आजच्या घडीला शांततेसाठी प्रयत्न करणारे शरीफ आणि मुनीर हेच दोन सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे जगाने त्यांना या पुरस्कारासाठी नामांकित करावे."

फसलेली मध्यस्थी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पवित्राएककीकडे पाकिस्तानमध्ये कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी दुसरीकडे या शस्त्रसंधीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीच्या दुसऱ्याच दिवशी स्पष्ट केले की, "आमचे सैन्य अजूनही सज्ज आहे." इतकेच नाही तर, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या अटींबाबत शहबाज शरीफ यांनी केलेला दावा देखील अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी फेटाळून लावला आहे.

भारत-पाकिस्तानच्या युद्धावेळी युद्ध थांबविल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. यानंतरही ते अनेकदा दावा करत होते. दोन अणुशक्तींमधील युद्ध थांबविल्यामुळे तसेच जगातील काही तंटे सोडविल्याने आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा, अशी मागणी ट्रम्प करत होते. आता पाकिस्तानमधून त्यांच्या नेत्यांना नोबेल मिळावा अशी मागणी केली जात आहे. 

थोडक्यात सांगायचे तर, प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती अनिश्चित असताना केवळ चर्चेच्या जोरावर आपल्या नेत्यांना 'नोबेल' मिळावे, अशी स्वप्ने पाकिस्तानी माध्यमांकडून पाहिली जात असल्याने सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Faces Rival: Pakistan Seeks Nobel for Ceasefire Mediation

Web Summary : Pakistan wants Nobel for PM Sharif, Gen. Munir for US-Iran ceasefire mediation claims. Trump previously sought Nobel for averting India-Pakistan war. US denies Pak role.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध