शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नोबेल विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 06:55 IST

या बैठकीत आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही दलाचे प्रमुखही उपस्थित होते.

बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळानंतर, अंतरिम सरकार स्थापन होत आहे. नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद युनूस यांना बांगलादेशमध्ये स्थापन होणाऱ्या या अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले आहे. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली बंगा भवनात (राष्ट्रपती भवन) झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोहम्मद युनूस यांच्याकडे अंतरिम सरकारचे नेतृत्व देण्यासंदर्भातील प्रस्ताव आंदोलक विद्यार्थ्यांनीही स्वीकारला आहे. या बैठकीत आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तिन्ही दलाचे प्रमुखही उपस्थित होते.

महत्वाचे म्हणजे, गरिबीशी लढण्यात 'बँकर ऑफ द पुअर' म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून आंदोलक विद्यार्थ्यांची पहिली पसंती होते.

शेख हसिना यांच्यावर युनूस यांचा निशाणा - युनूस हे नेहमीच शेख हसीना याचे कट्टर विरोधक राहिले आहेत. त्यांच्यावर टीकाही करत आले आहेत. आता शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर, द प्रिंटला दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन हा बांगलादेशचा दुसरा मुक्तीसंग्राम होता. हसीना देश सोडून गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत. आम्ही एक स्वतंत्र देश आहोत. जोवर त्या येथे होत्या आम्ही त्यांच्या ताब्यात होतो. त्या एका हुकुमशहा प्रमाणे वागत होत्या. सर्व काही नियंत्रणात ठेवत होती, असे युनूस यांनी म्हटले आहे. 

कोण आहेत मोहम्मद युनूस? -मोहम्मद युनूस हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे कट्टर विरोधक आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडण्यामागे असलेल्या मुख्य कारणांपैकी युनूस देखील एक कारण असल्याचे मानले जात आहे.

२८ जून १९४० रोजी मोहम्मद युनूस यांचा जन्म झाला. युनूस हे बांगलादेशातील उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी युनूस यांना २००६ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. युनूस यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनूस यांनी १९८३ मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला त्याच्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरात प्रशंसा मिळाली. त्यामुळे बांगलादेशातील मोठ्या संख्येने लोकांचे जीवनमान उंचावण्यात यश आले.

भारतावर केली होती टीका -सरकार कोसळण्याच्या आदल्याच दिवशी मोहम्मद युनूस यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. आंदोलसंदर्भात भारताने घेतलेल्या भूमिकेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनांवर भाष्य करण्यास नकार दिला होता. "ही देशांतर्गत बाब असल्याचे भारत म्हणतो तेव्हा मला वाईट वाटते. तुमच्या भावाच्या घराला आग लागली असेल तर तुम्ही त्याला घरगुती बाब कसे म्हणू शकता? अनेक गोष्टी मुत्सद्देगिरीत येतात आणि हा त्यांचा देशांतर्गत मुद्दा आहे असे म्हणता येणार नाही. बांगलादेशातील अशांतता शेजारील देशांमध्येही पसरू शकते," असे मोहम्मद युनूस यांनी म्हटले होतो.

टॅग्स :BangladeshबांगलादेशagitationआंदोलनStudentविद्यार्थीreservationआरक्षण