शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पिण्यासाठी पाणी मिळेना... दोन देशांत युद्ध? तालिबानने सीमेवर हजारो सैनिक, आत्मघाती हल्लेखोर पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 06:00 IST

इराणमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून, अफगाणिस्तानसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जलतंट्यामुळे ही समस्या अधिक चिघळली आहे.

तेहरान : इराण व अफगाणिस्तानात हेलमंद नदीच्या पाण्यावरून युद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. जलवाटप कराराचा आदर करा,  अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा इराणने दिल्यानंतर तालिबानने थेट युद्धाची तयारीच सुरू केली आहे. हजारो सैनिक  व आत्मघाती हल्लेखोरांना सीमेवर पाठविण्यात आले असून, अमेरिकेने मागे सोडलेली वाहने आणि शस्त्रेही सीमेकडे नेली जात आहेत. 

इराणमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून, अफगाणिस्तानसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जलतंट्यामुळे ही समस्या अधिक चिघळली आहे. तालिबान हेलमंद नदी पाणीवाटप कराराची अंमलबजावणी करत नसल्याचा इराणचा दावा आहे. इराणचे  अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी तालिबानला एकतर कराराचा आदर करा, अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा  दिला होता.   

या इशाऱ्यानंतर नुकतीच इराण व तालिबानमध्ये सीमेवर चकमक झाली. त्या चकमकीमुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. तालिबान मागे हटण्यास तयार नाही. त्याने युद्धाची तयारी चालवली आहे. हजारो सैनिक व शेकडो आत्मघाती हल्लेखोर सीमा भागात पाठवण्यात आले आहेत. सोबतच अमेरिकेने मागे सोडलेली वाहने आणि शस्त्रेही पाठवण्यात आली आहेत. (वृत्तसंस्था)

इराण म्हणतो : आम्हाला फक्त ४% पाणी मिळालेहेलमंद नदीच्या पाणीवाटपाबाबत उभय देशांत १९७३ मध्ये करार झाला होता; पण या कराराची अंमलबजावणीही झाली नाही. अफगाणिस्तानमधील इराणचे राजदूत हसन काझेमी कोमी यांनी म्हटले आहे की, इराणला गेल्या वर्षी केवळ चार टक्के पाणी मिळाले आहे. आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी अफगाणिस्तानने हेलमंड नदीवर अनेक ठिकाणी धरणे बांधली आहेत.

९७% इराणमध्ये दुष्काळाचे चटके, स्थलांतर वाढले

१०  हजारांहून अधिक कुटुंबांनी राजधानीतून पलायन केले होते.

टॅग्स :TalibanतालिबानIranइराण