शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 05:53 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एससीओकडून तीव्र निषेध

तियानजीन : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, हा हल्ला केवळ भारताच्याच नव्हे, तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक राष्ट्राच्या अंतरात्म्यावरचा आघात होता, अशी परखड टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. चीनमधील तियानजीन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी त्या देशाला खडेबोल सुनावले.

मोदी म्हणाले, दहशतवादाविरोधी लढ्यात कोणीही दुतोंडी भूमिका घेऊ नये. काही देश दहशतवादाला उघड पाठिंबा देत आहेत, हे इतर देशांना मान्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

भारताने दहशतवादाचे गंभीर परिणाम भोगले आहेत. ७ मे रोजी भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळ 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे नष्ट केले होते. पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्व देशांनी एकत्र येऊन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करण्याचे आवाहन केले. दरम्यान, सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एससीओ परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीच्या स्थळी आपल्या लिमोझिनमधूनच नेले. यावेळी दोन्ही नेत्यांत गाडीतून खाली न उतरताच एकांतात सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एससीओकडून तीव्र निषेध

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानही सदस्य असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेने (एससीओ) तीव्र शब्दांत निषेध केला. तर दहशतवादविरोधी लढ्यात दुतोंडी भूमिका खपवून घेऊ नका, या भारताच्या भूमिकेशी या संघटनेने सहमती दर्शविली.

एससीओने म्हटले की, दहशतवाद्यांचा धोका रोखण्यासाठी सर्व देशांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे. गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचाही या परिषदेत निषेध करण्यात आला. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करणे, उत्पादन, पुरवठा साखळीमध्ये स्थिरता आणणे, या गोष्टी निवेदनात नमूद केल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला