शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:14 IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांना नोबेल शांतता पुरस्कार न दिला गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे...

जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर, भारतानेपाकिस्तानला प्रत्त्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर चालवले. दरम्यान दोन्ही देशांत युद्धविरामाची घोषणा झाली. तेव्हापासूनच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच चर्चेत आहेत. आपल्यामुळेच जगातील दोन अण्वस्त्र संपन्न देशांत युद्धविराम झाला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केला आहे. मात्र त्यांचा हा दावा, भारताने फेटाळला आहे. यातच, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांना नोबेल शांतता पुरस्कार न दिला गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेक अंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. या घटनांसंदर्भात ते आपल्या योगदानाचा दावा करतात. या पोस्टमध्ये त्यांनी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रिपब्लिक ऑफ रवांडा यांच्यातील करारासाठी शांतता पुरस्कार मिळवणे, भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध रोखणे, सर्बिया आणि कोसोवोमधील युद्ध रोखणे, इजिप्त आणि इथिओपिया यांच्यात शांतता राखणे तथा इस्रायल आणि अरब देशांमधील शांतता करार (अब्राहम करार) यासंदर्भात भाष्य केले आहे." तसेच, एवढे सारे प्रयत्न करूनही, नोबेल समितीने आपल्याकडे दुर्लक्ष केले, मात्र, जनतेला माहीत आहे आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आसिम मुनीर यांना दिलं होतं जेवणाचं आमंत्रण -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच, पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना व्हाईट हाऊस येथे दुपारच्या जेवणाचे आमंत्रित केले होते. यावेळी दोघांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली. ही भेट मोठा चर्चेचा विषय ठरली होती. भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर, ट्रम्प यांनी पहिल्यांदाच एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटीसाठी बोलावले होते. मात्र, असे असले तरी, असीम मुनीर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समजदारी भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी उपयुक्त ठरली, असेही ट्रम्प म्हणाले होते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाNobel Prizeनोबेल पुरस्कारIndiaभारतPakistanपाकिस्तान